व्हेल मासा आणि त्याची उलटी Dainik Gomantak
महाराष्ट्र

व्हेल माश्याची 'उलटी' विकली जाते 1 कोटीला..

दैनिक गोमन्तक

रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर व्हेल मासा हे आवडते खाद्य आहे. या माशांचा वावर सद्या मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारी वाढला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये (International market) कोट्यवधीची रुपये किंमत असलेली व्हेल माशाची उलटी म्हणजेच (अंबर ग्रेस) हे सापडत आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

व्हेल माशांच्या एक किलो वजनाची उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जवळपास १ कोटी रुपये मिळतात. कोकण किनारवर सध्या या व्हेलच्या उलटीचे विक्री मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात व्हेलची उलटी विक्रीचे प्रकार समोर येत आहेत. गेल्या आठवड्यात चिपळूण मध्ये एकाच दिवशी दोन ठिकाणी उलटी विक्री करणाऱ्यांना अटक करण्यात आली होती.

मागच्या वर्षी कोकणामध्ये तीन जिल्ह्यात उलटी सापडत आहे. येथील मच्छीमारांना पूर्वी याबाबतची माहिती होती. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याचे वाढते महत्त्व लक्षात येत असल्याने याचे प्रकार समोर येऊ लागली आहेत.

गेल्या पाच-सहा वर्षात कोकण किनारपट्टीच्या भागात व्हेल माश्याचा वावरही वाढला असल्याचे काही अभ्यासकांनी सांगितले आहे. व्हेलचे खाद्य हे कवच असलेले मासे हे आहेत. यामध्ये माकुळ, कोळंबी, जेलीफिशचा यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षात कोकण किनारपट्टीवर माकुळचे प्रमाण वाढले आहे.

माकुळ खाण्यासाठी व्हेलीलाही कोकण किनारपट्टीकडे वळवण्यात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. व्हेल मासा जवळपास दीड ते दोन टन वजनाचा असून तो एका वेळी शंभर ते दोनशे ईतके माकुळ मासे खाऊ शकतो. माकुळ या माश्याच्या कवच असलेल्या भागाचे पचन होत नसल्याने त्याच्या पोटातच साठून राहतो. आणि हा भाग उलटीच्या रूपाने बाहेर येत असतो. त्यानंतर ही उलटी पाण्यावर तरगंत राहते आणि तिचा लगदा बनतो. पाण्याच्या प्रवाहांबरोबर हा लगदा किनारी भागात येऊन साठतो. तसेच किनारी भागात व्हेलचे प्रमाणा वाढत असल्याने त्याची उलटीही सापडण्याच्या संख्येत वाढ झाली आहे, असा अंदाज वर्तवण्यात आली आहे.

उलटी तयार होण्याचा कालावधी?

व्हेलची उलटी तयार होण्यासाठी कालावधी किती लागतो, अभ्यासकांकडून ही सांगणे शक्य झाले नाही. दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मादामास्कर, मालदीव, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, बहामा यासारख्या देशांमध्ये याचा मोठा वापर होतो. ही उलटी कशी ओळखायची यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयोगशाळा आहेत. तसेच स्थानिक पातळीवर जर पहावयाचे असेल तर तापवलेल्या सुईच्या माध्यमांतून ही उलटी तपासली जाते. ही सुई गोळ्यात टाकली की धूर येऊ तो भाग काळा होऊन त्याला एक मंद सुगंधित वास येतो. त्यावरून ही उलटी आहे हे समजले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: 35 अनधिकृत बांधकामांवर पुन्हा चालला बुलडोझर; करासवाडा जंक्शन येथे पालिकेची कारवाई

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर कुटुंबियांसह रात्रीचा प्रवास सुरक्षित आहे का? काय सांगतात प्रवासी

Goa Today's News Live: जीप संघटना दूधसागर पर्यटन हंगामाच्या विरोधात ठाम!

Ranji Cricket Tournament: अर्जुन तेंडुलकरसह हेरंब, शुभमचा भेदक मारा, सुयश आणि रोहणचं 'तूफान'; सिक्कीमचा संघ पत्त्यासारखा कोसळला !

गोव्याच्या भूमीत विकसित झालेली 'श्वेतकपिला' गाय; सरकारने राजाश्रय देण्याची गरज

SCROLL FOR NEXT