konkan railway Dainik Gomantak
महाराष्ट्र

Ganpati Special Trains: ‘गणपती स्पेशल’ गाड्याही पाच मिनिटांत फुल्ल; 800 वेटिंगनंतर रिझर्व्हेशन सेवा बंद

Ganpati Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरिता पश्चिम रेल्वेकडून ज्यादा सोडण्यात आलेल्या गाड्यांचे बुकिंग पहिल्या पाच मिनिटांत फुल्ल झाल्याची माहिती समोर आली आहे.

Manish Jadhav

Ganpati Special trains Western Railway Bookings Waiting List

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरिता पश्चिम रेल्वेकडून ज्यादा सोडण्यात आलेल्या गाड्यांचे बुकिंग पहिल्या पाच मिनिटांत फुल्ल झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघटनांनी ज्यादा सोडण्यात आलेल्या गाड्यांचे रिझर्व्हेशन सुरुवातीला 800 वेटिंग दाखवल्यानंतर पाच मिनिटांत बंद झाल्याचे सांगितले. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची यंदाही तारांबळ उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, काही मिनिटांत 800 वेटिंगवर पोहोचून बंद झाले. आता पश्चिम रेल्वेकडून सोडण्यात येणाऱ्या ज्यादा गाड्यांचे रिझर्व्हेशन 28 जुलै रोजी सकाळी सुरु झाले परंतु ते देखील पहिल्या पाच मिनिटांतच 800 वेटींग गेल्याने चाकरमान्यांना रिझर्व्हेशन करता आलं नाही. दरम्यान, पश्चिम रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या ज्यादा गाड्याही फुल्ल झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडणार हे मात्र नक्की आहे. दुसरीकडे, खाजगी बसचेही दरही गगनाला भिडले आहेत. या खाजगी बससेचे तिकीट अडीच हजारांच्या पार गेल्याने सर्वसामान्यांना कसे परवडणार? असा सवाल आता विचारला जावू लागला आहे.

दुसरीकडे, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि वांद्रे येथून कोकणात जाण्यासाठी गाड्या सोडण्यात येतात. मात्र बोरिवली येथून एकही गाडी नसल्याने या भागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होते. हे लक्षात घेऊनच यंदा कोकणात गणेशोत्सावासाठी चाकरमान्यांसाठी बोरिवली येथून वसईमार्गे रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते लवकरच या सेवेचा शुभारंभ करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT