Raj Thackeray: मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे नेहमीच आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्याचबरोबर, त्यांच्या बोलण्याच्या खास शैलसाठीदेखील राज ठाकरे प्रसिद्ध आहेत.
आता मात्र, त्यांनी राजकारण आणि राजकारणी यांच्यावर व्यक्तव्य केले आहे. राजकारण्यांकडून व्हीजन घेऊ नये तर त्यांना व्हीजन द्यावे. कारण राजकारण्यांकडे आता व्हीजनच उरले नाही असे त्यांनी म्हटले आहे.त्याचबरोबर त्यांनी प्रसारमाध्यमांविषयी बोलताना म्हटले आहे की, माध्यमां( Media )ची भूमिका महत्वाची आणि मोठी आहे.
जे राजकारणी अश्लाघ्य बोलतात अशा लोकांना तुम्ही लोकांना तुम्ही तुमच्या माध्यमांवर दाखवले नाही पाहिजे. कारण अशा राजकारण्यांना वाटतं आपण जे बोलतो त्याने आपल्याला प्रसिद्धी मिळते. शहरांकडे येणारे लोकांचे लोंढे कमी झाले पाहिजेत अशा पद्धतीने विकास व्हायला हवा. याबरोबरच, शहरात होणाऱ्या सुशोभिकरणावर त्यांनी टिपन्नी केली आहे. रात्री मुंबई( Mumbai) आहे की डान्सबार हेच कळत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रा( Maharashtra)च्या विकासाचे व्हिजन सांगणाऱ्या नेत्यांना माझ्यासमोर आणा मी त्यांना प्रश्न विचारतो. आपण अथक प्रयत्न करुनही आणि आपले हेतू साफ ठेऊनही मत मिळत नाहीत तेव्हा राग न येता वाईट वाटते असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.