Mumbai Airport: तस्करीचे 'हे' भन्नाट प्रकार पाहून व्हाल थक्क, पाहा मुंबई विमानतळावरील व्हिडिओ

मुंबई विमानतळ कस्टम्सने दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये संशयित म्हणून दोन परदेशी नागरिकांना थांबवून त्यांचा शोध घेतला.
Mumbai Airport
Mumbai AirportDainik Gomantak

Mumbai Airport Smuggling: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. कस्टम विभागाने मोठा कारवाई करत वेगवेगळ्या दोन परदेसी नागरिकांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुस्तकांमध्ये अमेरिकन डॉलर लपवून ठेवल्या प्रकरणी विभागाने दोन्ही परदेशींना अटक केली होती. या दोघांकडून अमेरिकन डॉलर आणि सोन्याची (Gold) पेस्ट जप्त करण्यात आल्याचे विभागाने माहिती दिली आहे. दोघांना अटक केल्यानंतर पोलिस त्यांची चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार 22 आणि 23 जानेवारी रोजी मुंबई विमानतळ (Mumbai) कस्टमने दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये संशयित म्हणून दोन परदेशी नागरिकांची चौकशी केली. त्यानंतर या दोघांकडून 90 हजार अमेरिकन डॉलर्स आणि पेस्टच्या स्वरूपात अडीच किलोहून अधिक सोने जप्त करण्यात आले आहे. या गोष्टी प्रवाशांच्या वह्या आणि अंडरगारमेंटच्या दोन्ही मध्ये लपवल्या होत्या.

  • याआधीही अनेक प्रकार आले समोर

यापूर्वी डीआरआयच्या पथकाने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Airport) दोन परदेशी नागरिकांना अटक केली होती. त्यांच्याकडून आठ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 40 कोटी रुपये आहे. सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मुंबई विमानतळावर अशी प्रकरणे समोर येत असतात. मागिल वर्षी 21 नोव्हेंबर रोजी एनसीबीने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यांनी मुंबईतून एका महिलेसह दोन परदेशी नागरिकांना कोकेनसह अटक केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com