Vijay Wadettiwar aggressive statement on Kangana Ranaut  Dainik Gomantak
महाराष्ट्र

'कंगना तर नाचणारी', मंत्री विजय वडेट्टीवारांची जीभ घसरली

कंगनाने मंगळवारी आपल्या इंस्टग्रामवर पोस्ट लिहीत महात्मा गांधींवर निशाणा साधला होता.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अभिनेत्री कंगना राणौतवर (Kangana Ranaut ) महात्मा गांधींबद्दल (Mahatma Gandhi) केलेल्या वक्तव्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. महात्मा गांधींवर भाष्य करण्याची तिची लायकी नाही, असे म्हणतच ती एक 'नचनिया' असल्याचे विधान केले आहे. त्यांनी महात्मा गांधींबद्दल केलेले भाष्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे असे देखील विजय वडेट्टीवार यांनी म्हण्टलं आहे. कंगनाने मंगळवारी आपल्या इंस्टग्रामवर पोस्ट लिहीत महात्मा गांधींवर निशाणा साधला होता.(Vijay Wadettiwar aggressive statement on Kangana Ranaut aap92)

त्यातल्या पहिल्या मॅसेज मध्ये कंगनाने एका जुन्या पेपरचे कटिंग पोस्ट करत लिहिले की," तुम्ही एकतर गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींचे समर्थक असू शकता. तुम्ही दोघे असू शकत नाही. निवडा आणि ठरवा.”कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये लिहिलेल्या संदेशात चक्क बापूंना सत्तेची भूक होती आणि ते धूर्त होते असे वर्णन करण्याचे धाडस केले. याआधी कंगनाने भारताला मिळालेले स्वतंत्र ही भीक असल्याचे म्हटले होते.कंगनाने “ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांना त्या लोकांनी त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले , ज्यांच्यावर अत्याचार करणार्‍यांशी लढण्याची हिम्मत किंवा तसे रक्त नव्हते. हे सत्तेचे भुकेले आणि धूर्त लोक होते. त्यांनीच आम्हाला शिकवले की जर कोणी तुमच्या एका गालावर चापट मारली तर दुसरा गाल त्याच्यासमोर फिरवा म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. याला स्वातंत्र्य नाही तर केवळ भीक मागणे म्हणतात . तुमचा नायक हुशारीने निवडा." अशी वादग्रस्त टीका केली होती.

कंगनाच्या याच विधानावर बोलताना काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, जर एखाद्या नृत्यांगना मुलीने महात्मा गांधींवर आरोप केले तर मी त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य समजत नाही. त्यांनी सांगितले की 10 पैकी 9 लोक तिच्याबद्दल वाईट बोलतात. त्याबद्दल अधिक बोलण्याची गरज नाही. तिचे विधाने विचारात घेऊ नयेत, असे ते म्हणाले. जर तुम्ही सूर्यावर थुंकले तर थुंकी तुमच्या अंगावर पडते. ती नाचणारी आहे, तिला काय उत्तर द्यायचे? अशा कडव्या शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील अभिनेत्री कंगना राणौतने महात्मा गांधींबद्दल केलेले वक्तव्य देशविरोधी असल्याचे सांगून पक्ष तिच्यावर कायदेशीर कारवाईचे संकेत दिले आहेत . यावर पक्ष कायदेशीर मत घेत असल्याचे पटोले यांनी सांगितले, तर नेते नसीम खान यांनी तक्रार नोंदविण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की, सत्ताधारी हे वक्तव्य करून वस्तुस्थितीचा विपर्यास करण्यासाठी चिथावणी देत ​​आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA, 1st ODI: रोहित-कोहलीची जोडी रचणार नवा इतिहास! मैदानात उतरताच मोडणार सचिन-द्रविडचा रेकॉर्ड; बनणार नंबर-1 भारतीय जोडी

श्रीलंकेत ‘दित्वा’ चक्रीवादळाचा हाहाकार! पूर आणि भूस्खलनात 47 जणांचा मृत्यू, 21 बेपत्ता; भारतालाही धोक्याचा इशारा VIDEO

Partgali Math Goa: पैंगिणीतल्या 'पर्वत कानन' स्थळी मूर्ती जड झाल्या, गायीने प्रकट होऊन जागा दाखवली; श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळ

PAK vs SL: पाकिस्तानची पुन्हा लाज गेली! 6 चेंडूत 10 धावा जमल्या नाही, श्रीलंकेसमोर टेकले गुडघे Watch Video

Cash For Job: नोकरीसाठी पैसा दिला, तरी ‘इतका आला कुठून?’ असे विचारत ED मागे लागते; पैसे देऊन अवलक्षण

SCROLL FOR NEXT