CM Eknath Shinde News  Dainik Gomantak
महाराष्ट्र

विधानसभेत मुलांच्या आठवणीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अश्रू अनावर Video

एकनाथ शिंदे म्हणाले की आजही मी मुख्यमंत्री म्हणून या सभागृहात बोलतोय यावर माझा विश्वास बसत नाही.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र विधानसभेत आज शिवसेना-भाजपने (Shivsena-BJP) मिळून बहुप्रतीक्षित फ्लोर टेस्ट पास केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारच्या बाजूने 164 आमदारांनी मतदान केले आणि त्याचवेळी त्यांच्या विरोधात 99 मते पडली. त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेत सर्वांचे आभार मानले आहेत. (Video of Chief Minister Eknath Shinde shedding tears over the memory of children in the Assembly)

मुलांचा उल्लेख करून शिंदे विधानसभेत भावूक झाले,

यादरम्यान अपघातात प्राण गमावलेल्या मुलांचा उल्लेख करताना एकनाथ शिंदे विधानसभेत भावूक झाले. ते म्हणाले की, माझी दोन मुले मरण पावली, तेव्हा वाटायचे की कोणासाठी जगायचे, कुटुंबासाठी जगायचे असे दिघे साहेबांनी सांगितले. दिघे साहेब घरी आले, 5 वेळा मी साहेबांना सांगितलं की मी आता काम करू शकत नाही पण दिघे साहेब मला म्हणाले की तू डोळे पुस, तुला दुसऱ्यांचे अश्रू पुसायचे आहेत.

त्यावेळी आनंद दिघे यांनी मला समजावले होते. आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने सरकार स्थापन केले आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून माझ्यासोबत, शिवसेनेचे 40 आमदार, 11 अपक्ष आमदार, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून एवढा मोठा निर्णय घेण्याचे धाडस केले, त्यांचे मी मनापासून आभार मानतो.

मी मुख्यमंत्री झालो यावर अजूनही विश्वासच बसत नाही - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले की आजही मी मुख्यमंत्री म्हणून या सभागृहात बोलतोय यावर माझा विश्वास बसत नाही, कारण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या घटना पाहिल्या तर लोकप्रतिनिधी विरोधात जात असतात. सत्तेसाठी, पण आज ही एक ऐतिहासिक घटना आहे ज्याचे देश आणि राज्य देखील साक्षीदार आहे.

पण साहेबांनी माझी काळजी घेतली आणि मला सभागृह घेऊन गेले. रात्री अकरा वाजेपर्यंत लोक माझ्या ऑफिसमध्ये असायचे, दिघे साहेब गेल्यानंतर ठाण्यातील वागळे इस्टेटमधला डान्सबार मोठा होता, पण तोही आम्ही संपवलाच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Crime: 2 महिला, एका बालिकेची निर्घृण हत्‍या! एक मृत्‍यू संशयास्‍पद; महिलांसोबतच्या वाढत्या घटनांनी डिचोली हादरले

Fishermen Pele: 'चर्चवरील हल्ल्याने मन व्यथित झाले'! मच्छीमार पेलेने व्यक्त केली खंत; दोषींवर कारवाईची केली मागणी

पर्यटकांसाठी महत्वाची अपडेट! गोव्यातून परतीचा प्रवास महागला; तिकीटदर दुपटीपेक्षा जास्त; वाढीव रकमेमुळे कोलमडले बजेट

Droupadi Murmu Goa Visit: राष्ट्रपतींनी मुर्मूंनी केला ‘वाघशीर’मधून प्रवास! ‘INS हंसा’ तळावर भव्य स्वागत; स्पेक्ट्रमची केली पाहणी

देशाला हादरवून सोडणाऱ्या 2025 मध्ये गोव्यात घडलेल्या तीन घटना

SCROLL FOR NEXT