होय, हे ED चे सरकार...' - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नव्या सरकारवर होत असलेल्या आरोपाचे देवेंद्र फडणवीस यांनी दिले शेलक्या शब्दात प्रतिउत्तर
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis NewsDainik Gomantak

आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विधानसभेत भाजप व शिंदे गटाने बहुमत सिद्ध केले. शिवाय शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांचा शिंदे गटात समावेश करण्यात आला आहे. असे असले तरी शिवसेनेची गळती अद्याप थांबलेली नाही. कारण सेनेनेतील काही नेते अजून ही शिंदे गटाला मिळतायेत. याच दरम्यान महाविकास आघाडीतील नेते आणि शिंदे गटातील नेत्यांनी जोरदार फटकेबाजी केली. (Allegations on the Government of Maharashtra about 'ED'; Devendra Fadnavis gave the answer )

Devendra Fadnavis News
महाराष्ट्राच्या शिंदे सरकारने विधानसभेत बहुमत ठराव जिंकला, समर्थनात 164 मते

यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे ही चिमटे काढले. तसेच दुसऱ्या बाजूने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही शब्दांचे खेळ केले. ते म्हणाले की, 'हे ईडीचे सरकार आहे, असे लोक टोमणे मारतात. होय, हे ईडीचे सरकार आहे,म्हणजेच एकनाथ-देवेंद्रांचे,’सरकार आहे. हे सरकार बदलण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचा गैरवापर केल्याचा आरोप होत आहे. या आरोपावर फडणवीसांनी शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिले. (Devendra Fadnavis News)

Devendra Fadnavis News
उमेश कोल्हेच्या 'त्या' पोस्ट नंतर रचला खुनाचा कट

या आरोपांना प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी 2019 मध्ये भाजप-शिवसेनेच्या निवडणूकपूर्व युतीला जनादेश मिळाला, मात्र आमच्याकडून जाणूनबुजून बहुमत हिरावून घेतले, असा उल्लेख केला. ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा संदर्भ देत होते, ज्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला सोडचिठ्ठी दिली.

यावेळी अजित पवारांनी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकत्र काम केल्याचे दाखले देत, या सरकारने ही सामान्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावे असे म्हटले. तसेच त्यांनी एकनाथ शिंदे यांना नाराजीमूळे भाजप समर्थन करत गट बदलण्याऐवजी एकदा कानात सांगितले असते, तरी मी याबद्दल मुख्यमंत्र्यांना गांभिर्याने विचार करण्यास सांगितले असते असा ही टोला त्यांनी शिंदेंना लगावला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com