Vaibhav Naik On Pakya Bidwalkar Case Dainik Gomantak
महाराष्ट्र

Crime News: बीडपेक्षा सिंधुदुर्गची अवस्था भयानक! पक्या बिडवलकर खुनाच्या तपासात पोलिसांवर बड्या राजकीय नेत्यांचा दबाव; वैभव नाईकांचा आरोप

Vaibhav Naik On Pakya Bidwalkar Case: कुडाळचे माजी आमदार वैभव नाईक यांनी 2023 मधील पक्या बिडवलकर हत्या प्रकरणावर सोशल मीडिया पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे.

Sameer Amunekar

सिंधुदुर्ग: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि कुडाळचे माजी आमदार वैभव नाईक यांनी 2023 मधील पक्या बिडवलकर हत्या प्रकरणावर सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट सवाल उपस्थित करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

वैभव नाईकांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?

वैभव नाईक यांनी एक व्हिडिओ आणि काही फोटो पोस्ट करत या प्रकरणातील अनेक संशयास्पद बाबींवर लक्ष वेधले असून, सत्ताधारी आमदार आणि वरिष्ठ नेत्यांनी गेली दोन वर्षे पोलिस तपासावर दबाव आणल्याचा गंभीर आरोप केला आहे.

बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक आहे. २२ हजारासाठी सिद्धीविनायक उर्फ पक्या बिडवलकर यांना नग्न करत अमानुष मारहाण करून खून करणाऱ्या सिद्धेश शिरसाट याचा आका कोण? अशी पोस्ट वैभव नाईक यांनी केली आहे. वैभव नाईक यांच्या पोस्टमुळं हे प्रकरण सध्या चर्चेत आलंय.

Vaibhav Naik Social Media Post

वैभव नाईक यांनी केलेल्या पोस्टमध्ये सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री असताना सिद्धेश शिरसाट त्यांचे स्वागत करतानाचा एक फोटो आहे. तसंच खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, आमदार रवींद्र फाटक यांच्यासोबचेही काही फोटो शेअर केले आहेत.

२२ हजार रुपयांसाठी हत्त्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चेंदवन गाव थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे हादरून गेलं होतं. मार्च २०२३ मध्ये घडलेल्या या घटनेत पक्या बिडवलकर याचे काही व्यक्तींनी अपहरण करून अमानुषपणे मारहाण केली आणि नंतर त्यांचा खून करून पुरावे नष्ट केले.

केवळ २२ हजार रुपयांच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून हे थरारक कृत्य करण्यात आले, असे प्राथमिक तपासात उघड झालं होतं.

हत्येच्या घटनेनंतर आरोपींनी पक्या बिडवलकरचा मृतदेह स्मशानभूमीत नेऊन जाळून टाकला. मात्र या भयानक कृत्यानेही आरोपी शांत झाले नाहीत. त्यांनी मृतदेहाची राख आणि हाडं गोळा करून तेरेखोल नदीत टाकून पुरावे नष्ट केले.

दोन वर्षांनंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पक्या बिडवलकरच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत निवती पोलिसांनी तत्काळ चौकशी सुरू केली आणि चार आरोपींना ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींना कुडाळ न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT