Rane Vs Naik Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sindhudurg: कोकणात राजकारण तापलं, वैभव नाईक यांचे निलेश राणे यांना आव्हान

राणेंच्या दबावाला आम्ही यापूर्वी भिक घातली नाही आणि यापुढेही घालणार नाही - वैभव नाईक

गोमन्तक डिजिटल टीम

कोकणात वैभव नाईक (Vaibhav Naik) विरुद्ध राणे यांच्यातील वाद वाढताना दिसत आहे. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. या विरोधात नाईक यांनी कुडाळमध्ये मोर्चा काढला. यावेळी वैभव नाईक यांनी निलेश राणेंनी (Nilesh Rane) लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकीत उभं राहून दाखवावे असं खुलं आव्हान दिलं आहे.

वैभव नाईक यांनी कोकणात काढलेल्या मोर्चात खासदार अरविंद सावंत, भास्कर जाधव यांनी उपस्थिती लावत, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावेळी वैभव नाईक म्हणाले, "माझ्याकडे एक रुपया जरी बेहिशोबी असेल तर मला फासावर लटकवा असे माझे पोलिसांना आवाहन आहे. मला अटक करून मी भारतीय जनता पार्टी (BJP) किंवा राणें समोर झुकेन असे कोणाला वाटत असेल तर हे शक्य होणार नाही. राणेंच्या दबावाला आम्ही यापूर्वी भिक घातली नाही आणि यापुढेही घालणार नाही. "

वैभव नाईक पुढे म्हणाले, "2014 च्या निवडणूकीत नारायण राणेंचा (Narayan Rane) पराभव केला आता निलेश राणेंनादेखील पराभूत करू. आपण उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हिम्मत असेल तर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी (सन 2024) मध्ये आपल्या विरुद्ध निवडणूक लढवूनच दाखवावी." असे आव्हान राणे यांना दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT