union minister narayan rane says uddhav thackeray will step down as chief minister before june Dainik Gomantak
महाराष्ट्र

सरकार गडगडणार, नारायण राणेंची नवी भविष्यवाणी

हे सरकार जून महिन्याच्या अगोदरच कोसळणार; नारायण राणे

दैनिक गोमन्तक

मी महसूलमंत्री होतो तेव्हा 82 एकरचा सरकारी भूखंड फक्त 12 कोटी रुपयांमध्ये विकला असा आरोप माझ्यावर करण्यात आला. पण, माझं सरकारला आव्हान आहे की फक्त आरोप करू नका, कोणतीही चौकशी लावा, असं आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सरकारला दिलं आहे. तसेच ठाकरे सरकार कोसळण्याच्या तारखा याआधी भरपूर वेळा जाहीर केल्या आहेत. आता पुन्हा एकदा नारायण राणेंनी ठाकरे सरकार कोसळण्याची तारीख जाहीर केली आहे. जून महिन्याआधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावरुन जातील, अशी भविष्यवाणी नारायण राणेंनी केली आहे.

महाविकास आघाडी हे एक फांद्यांचं झाड आहे. आमच्याकडे कोकणात जूनमध्ये वादळ येतं. वादळ आलं की झाडं उन्मळून पडतात. झाडाच्या एका फांदीवर मुख्यमंत्री आहेत. ते मुख्य खोड नाहीत. त्यामुळं हे सरकार जून महिन्याच्या अगोदरच कोसळणार असं भाकीत नारायण राणे यांनी वर्तवलं.

मनसेचं इंजिन सध्या हिंदुत्वाच्या ट्रॅकवर धावत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप-मनसे युतीची जोरदार चर्चाही सुरु आहे. इकडे मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा कथित भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी भाजपच्या पोलखोल अभियानाची सुरुवात झाली आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण जोरदार तापलं आहे. अशा तापलेल्या वातावरणात सरकार पडण्याची नवी तारीख नारायण राणेंनी जाहीर केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT