राजकारण तापलं! 'राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली तर रस्त्यावर उतरू'

राज ठाकरे यांचे विधान दोन समाजात तेढ निर्माण करणारे; वंचीत
raj thackerays meeting is allowed we will take to the streets vba warning
raj thackerays meeting is allowed we will take to the streets vba warning Dainik Gomantak
Published on
Updated on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात सभा घेत 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र , यावरून आता राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेला विरोध होत आहे. तसंच राज यांच्या सभेला परवानगी मिळाली तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

मशिदीवरील भोंगा काढले नाही तर आम्ही तिथे हनुमान चालीसा लावून असे विधान राज ठाकरे यांनी केले होते. तीन तारखेपर्यंत मुदत दिली आहे. पण हे आम्हाला मान्य नसून राज ठाकरे यांचे विधान दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहेत.

raj thackerays meeting is allowed we will take to the streets vba warning
युरोपसोबत भारताची शिखर परिषद, पंतप्रधान मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर

राज ठाकरे हे सर्व भाजपच्या बोलण्यावरून करत आहेत. त्यांनी यावर बोलूच नये. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या भाषणांमुळे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचे कारण देत वंचित बहुजन आघाडीने या सभेला परवानगी देवू नये अशी भूमिका घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंनी आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे. शिवतीर्थावरील गुडी पाडव्याच्या सभेत तसंच ठाण्याच्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी जहाल हिंदुत्वाचं दर्शन घडवलं. त्याच दृष्टीने मनसेची सध्या वाटचाल सुरु आहे, मग ती बेकायदेशीर भोंग्याविरोधात उठवलेला आवाज असो वा हनुमान चालिसा, महाआरती असो... राज ठाकरेंचं रेल्वेइंजिन हिंदुत्वाच्या रुळावर धावत आहे. येत्या 5 जून रोजी राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com