uddhav thackeray rally live updates from mumbai likely to target bjp and mns over hanuman chalisa and loudspeaker Danik Gomantak
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी घेतला विरोधकांचा खरपूस समाचार, आम्ही त्या गाढवांना सोडले

स्वातंत्र्य लढ्यावेळी संघ कुठे होता? उद्धव ठाकरेंचा सवाल

दैनिक गोमन्तक

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याकडे राज्य नव्हे तर देशाचे लक्ष लागले होते. मुंबईतील कल्याण डोंबिवलीमध्ये सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. शाखा स्तरावर बैठका घेण्यात आल्या होत्या.

दरम्यान, बऱ्याच दिवसांनी मैदानात उतरलो आहे. ज्यांना महाराष्ट्र म्हणजे काय आहे हे माहित नाही त्यांच्यासाठी बोलाव लागत आहे. भाजपसोबत होतो तेव्हा आमचं हिंदुत्व गधाधारी होते. आता आम्ही त्या गाढवांना सोडले आहे. अस म्हणत भाजपवर निशाना साधला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, सामनात येणारं देशाच्या आणि राज्याच्या हिताचं असतं. आम्ही भाजपच्या भाषेत मोदींचा अपमान कधी केला नाही. अस स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं. तुमचे संस्कार सोडल्यावर तुमचं हिंदुत्व राहतं कुठे? संवेदनशील भाजप आता कुठे गेला, आता जबाबदारी कुणावर आहे. असा सवाल उद्धव यांनी यावेळी केला.

संघ एकदाही भारताच्या स्वातंत्र लढ्यात नव्हता, कुठे होता संघ लढ्यावेळी? स्वातंत्र्य लढ्यात संघाचे योगदान नाही. संयुक्त लढ्याच्या लढाईतून पहिलं कोण फुटलं तर यांचे बाप म्हणजे संघ... तेव्हा पासून मुंबईचा लचका तोडण्याचं काम सुरु आहे. मुंबई ही मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे. मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला तर तुकडे केल्याशिवाय राहणार नाहीत. असा ईशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

शिवसेनेची मुंबईमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेले होते. या सभेसाठी मंचावर शिवसेने प्रमुख नेते उपस्थीत आहेत. यामध्ये संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, दादा भुसे, गुलाबराव पाटील, अरविंद सावंत, उदय सामंत, विनायक राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई, आदेश बांदेकर, मंचावर उपस्थित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT