Happy Birthday Udhav Thackeray महाराष्ट्राचे संयमी मुख्यमंत्री
Happy Birthday Udhav Thackeray महाराष्ट्राचे संयमी मुख्यमंत्री Dainik Gomantak
महाराष्ट्र

Happy Birthday Uddhav Thackeray: हेच ते महाराष्ट्राचे संयमी मुख्यमंत्री

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray) यांची कारकिर्द आपण लक्षात घेतल्यास मुख्यमंत्री पदाच्या आधी त्यांनी शिवसेनेची धुरा समर्थपणे पेलली आणि अजूनही ते त्याच ताकदीने शिवसेनेला पुढे घेऊन जात आहेत. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसाला त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहुन स्वत:चा हक्क कसा मिळवायचा ते शिकविले. बाळासाहेब ठाकरे यांचा स्वभाव तसा आक्रमक तीच आक्रमकता आपल्याला शिवसेनेमध्ये उतरलेली दिसते. परंतु 2003 साली उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर शिवसेनेचा चेहरा काहीप्रमाणात बदलला, आक्रमक शिवसेनेत संयमीपण देखील उध्दव ठाकरे यांच्यामुळे आला. उध्दव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांची शैली कॉपी केली नाही. शिवसेनेची सूत्रे त्यांनी आपल्या हातात घेतल्यानंतर त्यांनी आपल्या स्टाईलने शिवसेनेला मोठे करण्याचा प्रयत्न केला, आणि आजही करत आहेत.

खोटे बोलण्याचे संस्कार माझ्यावर नाहीत

भाजपने आपल्याला दिलेले वचन मोडले आहे. त्यांनी मला खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला, मी आजवर कधीही खोटे बोललो नाही आणि बोलणार नाही. माझ्यावर असे संस्कार देखील नाही. असे परखड शब्दात उध्दव ठाकरे यांनी भाजपला सांगत विधानसभा निवडणुकीनंतर युतीला रामराम केला व आघाडीसोबत सत्ता स्थापन केली. मी शिवसेना प्रमुखांना वचन दिले आहे, ‘एक ना एक दिवस मी विधानभवनावर भगवा नक्की फडकविणार आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार’ असे सांगत शिवसेनेने विधानसभा निवडणुका भाजपसोबत युतीत लढविल्या. त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ‘मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन…’ असा नारा दिला. निवडणुकीआधी उध्दव ठाकरे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठकीनंतर सत्ता आणि पद यांचे समसमान वाटपाचा फॉर्म्युला ठरला तसे दोघांकडून पत्रकार परिषदेत जाहीर देखील करण्यात आले. मात्र निवडणुकीनंतर भाजपला 105 आणि शिवसेनेला 57 जागा मिळाल्यानंतर भाजपने दिलेल्या शब्दाचा शब्दखेळ करण्यास सुरुवात करत, मुख्यमंत्री पद वाटून घेण्यास नकार दिला. तेथूनच खरा महाविकास आघाडीचा माहामेरु रोविण्यास सुरुवात झाली असली तरी निवडणुकीआधी झालेली शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांची भेटीत देखील महाविकास आघाडीचे गुढ लपले आहे.

जन्मभर भाजपची पालखी वाहणार नाही

महाविकास आघाडीत शिवसेनेच्या 57, राष्ट्रवादीच्या 53 आणि काँग्रेसच्या 43 जागा आहेत. मुख्यमंत्रीपद पाच वर्षे शिवसेनेकडेच राहिल असे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सुरुवातीलाच सांगितले, पण मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे बसतील असेही आदेश शरद पवारांनी दिले. उध्दव ठाकरे यांना मनातून मुख्यमंत्री पदाची आस कधीच नव्हती. त्याचे कारण देखील तसेच आहे. ठाकरे कुटुंबात कोणीही कधीही सत्तेच्या पदावर विराजमान झालेले नाही. सत्तेचा कंट्रोल मात्र त्यांनी मातोश्रीतून संभाळला आहे. पण मुख्यमंत्री शिवसेनेचा करावयाचा असेल आणि शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकवायचे असेल, तर उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची धुरा संभाळावीच लागेल असे खुद्द शरद पवार यांनी सांगितले. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही आघाडी बनविण्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका निभावली, आणि उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री करत शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला शब्द खरा करुन दाखविला. तुम्ही काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असे वचन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते का? असा सवाल भाजप कडून ठाकरे यांना केला जातो. त्याचे देखील उत्तर त्यांनी त्यांच्या शैलीत दिले आहे. मी काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन असे वचन दिले नसले तरी, जन्मभर भाजपची पालखी वाहणार नाही असेही वचन दिले असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती थेट राज्याच्या प्रमुखपदी विराजमान झाली. तसेच ठाकरे घराण्यात पहिल्यांदाच निवडणूक लढणारे आदित्य ठाकरे यांची थेट कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली.

पंतप्रधानपदासाठी ठरु शकतो का ? अश्वासक चेहरा

उध्दव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर राज्यावर अनेक संकटे आली त्यातच जगाला हादरवून सोडणारे संकट म्हणजे कोरोनाचे! महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला मात्र तेवढ्याच प्रशासकिय कौशल्याच्या जबाबदारीने कोरोनाला आटोक्यात आणण्याचे कार्य मुख्यमंत्र्यांनी केले. कोरोना काळात त्यांनी राज्यात केलेल्या कामामुळे राज्यातील जनता त्यांना आपल्या घरातील एक कुटुंबप्रमुख म्हणून ओळखू लागली. कोरोना काळातील सक्रीय आणि कार्यशील मुख्यमंत्री म्हणून बहुमानही प्राप्त झाला. राज्यात कोरोनाला आटोक्यात आणणाऱ्या पॅटर्नची जगभर चर्चा झाली. यात मुंबईतील धारावी पॅटर्नचे थेट जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले. कोणताही प्रशासकीय अनुभव गाठीशी नसताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे राज्यात करत असलेल्या कामामुळे ते देशातील मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये सर्वात अग्रस्थानी आहेत. येणाऱ्या काळात त्यांना पंतप्रधानपदासाठीचा एक आश्वासकीय चेहरा म्हणून पाहिले जाऊ शकते, असे खुद्द काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT