24 तासात 1000 मृत्यू;  उद्धव ठाकरे आज घेणार महत्त्वाची बैठक; मोठा निर्णय होणार?

uddhav thackeray.jpg
uddhav thackeray.jpg

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. राज्यात एका दिवसांत पहिल्यांदाच कोरोना संसर्गामुळे राज्यात प्रथमच एक हजाराहून अधिक लोकांनी आपले जीव गमावले आहेत.  या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि कोरोना लसीकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री ठाकरे चर्चा करणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोनाच्या परीस्थितीचे मूल्यांकन, आणि त्यानंतर ते जिल्हाधिकारी व आयुक्तांशीही चर्चा करणार आहेत.  (1000 deaths in 24 hours; Uddhav Thackeray to hold important meeting today; Will there be a big decision?) 

मुंबईच्या बीकेसी जंबो लसीकरण केंद्राबाहेर लसीकरणासाठी लोकांची लांबलचक रांग लागली आहे. तर मुंबईतीलच नेस्को लसीकरण केंद्राच्या बाहेरही कोरोना लसीसाठी लोकांची मोठी रांग लागल्याचे पाहायला मिळत आहे. काल लस संपल्यानंतर याठिकाणी लसीकरण थांबविण्यात आले होते. तर, सकाळी साडेदहा वाजता कोवि शिल्डची लस आणली जाईल. ज्यांना कोव्हॅक्सीन लस घ्यायची होती ते साडेआठ वाजताच आत गेल्याची माहिती लस घायला आलेल्या एक महिनेने दिली आहे.  

दरम्यान, महाराष्ट्रात बुधवारी 63,309नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनाने 985 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या महितीनुसार, राज्यात संसर्ग झालेल्यांची संख्या 44,73,394 वर पोहचली आहे. तर  67,214 जणांनी कोरोनाने मृत्यू झाले आहेत. त्याचबरोबर, गेल्या 24 तासांत एकूण 61,181 रुग्ण बारे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 37,30,729 वर पोहचली आहे. 

तर, 6,73,481 कोरोना संक्रमित लोक अद्यापही उपचार घेत आहेत. तर राजधानी मुंबईत 4966 नवी प्रकरणे समोर आली आहेत. तर 78 लोक मृत्युमुखी पडले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) ने दिलेल्या माहितीनुसार, नव्या प्रकरणांची नोंद झाल्यानंतर मुंबईतील कोरोना संक्रमणाचा आकडा 6,40,507 वर पोहचला आहे. तर, आतापर्यंत 12,990 मृतांची नोंद करण्यात आली आहे. तसेच,  गेल्या 24 तासांत 5300  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे शहरात आतापर्यंत 5,60,401 कोरोना संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com