Chief Minister Uddhav Thackeray
Chief Minister Uddhav Thackeray  Dainik Gomantak
महाराष्ट्र

ठाकरेंच्या अडचणींमध्ये वाढ ; आणखी 4 आमदार 'शिंदे गटात' सामील

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील उद्धव सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांचा फेसबूक लाईव्ह नंतरही शिवसेनेच्या आमदारांची बाजू बदलण्याची प्रक्रिया सुरूच आहे. बुधवारी रात्री शिवसेनेचे आणखी चार आमदार गुवाहाटीतील शिंदे गटात सामील झाले आहेत. एवढेच नाही तर आणखी दोन आमदार आज गुवाहाटीला जाऊ शकतात.

बुधवारी रात्री आठच्या सुमारास शिवसेनेचे चार आमदार गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये पोहोचले. एकनाथ शिंदे इतर बंडखोर आमदारांसह या हॉटेलमध्ये थांबले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह हे चार आमदार सुरतहून गुवाहाटीला रवाना झाले होते. गुवाहाटीला पोहोचलेल्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये गुलाबराव पाटील आणि योगेश कदम यांचाही समावेश आहे.

आणखी दोन आमदार आज गुवाहाटीला जाऊ शकतात
कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर आणि दादरचे आमदार सदा सरवणकर हेही शिंदे कॅम्पला पोहोचू शकतात. मुंबईतही शिवसेनेचे तीन आमदार शिंदे यांचे समर्थक असल्याचे बोलले जाते. दाव्याप्रमाणे हे आमदार त्यांना सामील झाल्यास शिंदेंसोबत असलेल्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या 36 वर पोहोचेल, तर इतर 12 आमदारही शिंदे यांच्यासोबत असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, काल शिंदे गटाने 34 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवले आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेना विधीमंडळ पक्षनेते असल्याचे पत्रात म्हटले आहे. भरत गोगावले यांची नवे मुख्य व्हीप म्हणून निवड करण्यात आली आहे. शिंदे यांची मंगळवारी शिवसेनेने विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT