Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : नाव, धनुष्यबाण चोरला, जीवाभावाची माणसं चोरु शकत नाही; उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला

Rajat Sawant

शिवसेनेने भाजपला राजकारणामध्ये जन्म दिला. त्याच राजकारणातील जन्मदात्या आईच्या कुशीवर वार करणारे हे चोर आज जनतेसमोर धनुष्यबाण घेवून फिरणार आहे. भाजप हा भ्रष्ट नेत्यांचा पक्ष आहे. भारतीय जनता भ्रष्ट नाही आहे.

भाजपने भारतीय जनता पक्ष असे नाव बदलून भ्रष्ट झालेला पक्ष असे नामकरण करावे. आमच्या कुटुंबीयांच्या बदनामीचा प्रकार थांबवला नाही तर तुमच्या कुटुंबीयांची प्रकरणे चव्हाट्यावर काढावी लागतील असा इशारा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नाशिकमधील मालेगाव येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे, भाजपवर टिकेची तोफ डागली.

आजची सभा बघून शिवसेनेचं काय कमी केलं तुम्ही, नाव चोरलं, धनुष्यबाण चोरला, तुम्ही जीवाभावाची प्रेम करणारी माणसं चोरु शकत नाही, ही भाड्याने आणता येत नाहीत, असा टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला.

रतन काकांनी कांदा लागवडीसाठी कर्ज घेतलं, पत्नीचे दागिने गहाण, सगळे पैसे लावले, विचार हाच की सोन्यासारखं पीक हाती येईल, पण कांद्याची विल्हेवाट लागली, कर्ज वाढलं, पत्नीचे दागिने अडकले, नातीचं लग्न लांबणीवर गेलं.

मला उत्तर देण्यासाठी इथे सभा घेणार आहात ना त्याआधी रतन काकांसारख्या डोक्यावर कर्जाचं डोंगर असलेल्या शेतकऱ्यांना उत्तर द्या, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं.

कृष्णा डोंगरेंनी रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्र्यांना वाचायला जमत नाही, भाषणे चांगली वाचता येतात. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जातात. स्वत:च्या शेतात रमतात पण शेतकऱ्यांच्या बांधावर यायला वेळ नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

गेल्या वर्षी एका कांद्याची 50 खोक्याला खरेदी झाली असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सुहास कांदे यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला.

सावरकर आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान आम्हाला पटणार नाही. लढायचे असेल तर दैवतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही असा उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी यांना इशारा दिला. 14 वर्ष सावरकरांनी छळ सोसला. 14 वर्ष सावरकरांनी मरण यातना सहन केली असेही उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT