Bansuri Swaraj: सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी यांना भाजपने दिली मोठी जबाबदारी

Bansuri Swaraj: भाजपच्या दिवंगत नेत्या दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांच्यावर भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
Bansuri Swaraj
Bansuri SwarajDainik Gomantak

Bansuri Swaraj: भाजपच्या दिवंगत नेत्या दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांच्यावर भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

त्यांना दिल्ली भाजपच्या कायदेशीर कक्षाचे सहसंयोजक बनवण्यात आले आहे. हे पद मिळाल्यानंतर बांसुरी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. सध्या, बांसुरी स्वराज सर्वोच्च न्यायालयात क्रिमिनल लॉयर म्हणून वकिली करत आहेत.

दरम्यान, दिल्ली भाजपचे (BJP) प्रमुख वीरेंद्र सचदेवा यांनी बांसुरी स्वराज यांना कायदेशीर सेलचे सह-संयोजक म्हणून नियुक्त केले, त्यानंतर त्यांनी राज्य युनिटमधील त्यांच्या पहिल्या नियुक्तीमध्ये पक्षाच्या पूर्णवेळ प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.

शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या पत्रात सचदेवा म्हणाले की, स्वराज यांची नियुक्ती तात्काळ लागू होईल. भाजपला अधिक मजबूत करण्यासाठी त्या काम करतील, अशी अपेक्षा आहे.

Bansuri Swaraj
Rahul Gandhi Twitter Bio: राहुल गाधींनी खासदारकी गमावल्यानंतर ट्विटर बायोमध्ये केला मोठा बदल

तसेच, भाजपने हे पद दिल्यानंतर बांसुरी यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा (Amit Shah), जेपी नड्डा, बीएल संतोष, वीरेंद्र सचदेवा, दिल्ली भाजपचे आभार मानले आहेत.

बांसुरी या दिवंगत सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल यांच्या एकुलत्या एक कन्या आहेत. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे.

शिक्षण पूर्ण झाल्यापासून त्या दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात क्रिमिनल लॉयर म्हणून प्रॅक्टिस करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com