Uddhav Thackeray  Dainik Gomantak
महाराष्ट्र

काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील : मुख्यमंत्री ठाकरे

महाराष्ट्राने कश्मिरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नाते जपले आहे : उद्धव ठाकरे

दैनिक गोमन्तक

मागील काही दिवसांपासून काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्येचे प्रकार घडले आहेत. परिणामी अनेक काश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Uddhav Thackeray Kashmiri Pandit)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील खोऱ्यातील या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “कश्मीर खोऱ्यात कश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली, पण घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले, ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे. याक्षणी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी इतकंच वचन देऊ शकतो की, या कठीण काळात काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील.”

ठाकरे पुढे म्हणाले, "महाराष्ट्राने कश्मिरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नाते जपले आहे."
केंद्र सरकारने परिस्थितीचा आढावा घेऊन काश्मिरी पंडितांना संरक्षण द्यावे, अशी मागणी देशभरातून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्यांचे सेपाक टाक्रो प्रेम!

दारूतून पाजले गुंगीचे औषध; गोव्यात सलून चालवणाऱ्या महाराष्ट्रातील 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Aguada: 'खराब हवामानात बोट खोल समुद्रात गेलीच कशी'? आग्वाद क्रूझ घटनेची गंभीर दखल; बंदर कप्तान खाते करणार कडक कारवाई

Kidnapping Cases: दक्षिण गोव्यात काय चाललंय? 117 अल्पवयीन मुलांचे अपहरण; प्रेम प्रकरणातून पळून जाण्याच्या घटना वाढल्या

Omkar Elephant: 'ओंकार' हत्तीमुळे 31 शेतकऱ्यांना फटका, 'आधारनिधी' अंतर्गत मिळणार नुकसानभरपाई; अर्ज करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT