Uddhav Thackeray on Raj Thackeray  Danik Gomantak
महाराष्ट्र

काहींना बाळासाहेब ठाकरे असल्यासारखं वाटतं, राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

तुम्ही बाबरी पाडल्यानंतर शेपट्या आत घालून बसला होतात, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून लाऊडस्पीकर आणि हिंदुत्वा भोवती फेर धरत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित करत राज्यासह देशातील राजकारण्यांना भांडणासाठी नवा मुद्दा दिला. यातच आता राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज महासभा घेत शिवसेना कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील जनतेला नवा संदेश दिला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना भाजपवर निशाणा साधला. (Uddhav Thackeray on Raj Thackeray)

तसेच काहींना बाळासाहेब ठाकरे असल्यासारखं वाटतं, राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल केला. मुन्नाभाई चित्रपटात कस त्याला गांधीजी दिसतात तस एकाला बाळासाहेब दिसतात, भगवी शाल घालुन फिरतो. म्हंटल अरे तो मुन्नाभाई तर लोकांच भल तरी करतो. त्यात शेवटी कळत की केमिकल लोचा झाला आहे, हे तसंच आहे.

अशी चित्र-विचित्र भानगडी करणारी माणसं बघितल्यानंतर हे स्वत:ला हनुमान पुत्र म्हणवू तरी कसे शकतात. ज्या हनुमानाने पेटत्या शेपटीने लंका जाळली होती, तुम्ही बाबरी पाडल्यानंतर शेपट्या आत घालून बसला होतात. तुमची वितभर नाही, कित्येक मैल पळापळ झाली होती. हनुमान पुत्र वगैरे शब्द तुमच्या तोंडी शोभत नाहीत. असा घणाघात उध्दव ठाकरे यांनी भाजपवर केला.

तसेच जणूकाही महाराष्ट्रात भंगार राज्य चाललंय असं सुरू आहे. आता दाऊदच्या मागे चाललेत. दाऊद उद्या म्हणााला मी भाजपात येतो, तर उद्या मंत्री म्हणून त्यांच्यासोबत कधीही दिसू शकतो. कदाचित म्हणून त्याच्या मागे लागले असतील. बघ, ईडी वगैरे मागे लागतं. आमच्यासोबत ये, तुला मंत्री बनवतो. उद्या हे दाऊदलाही मंत्री बनवतील आणि सांगतील दाऊद आमचा गुणाचा पुतळा आहे.

शरद पवारांवर एका बाईने विचित्र कॉमेंट केली. घरी आई-वडील कुणी आहे का? संस्कार काही होतात की नाही? काहीही झालं, तरी बाई तुझा संबंध काय? कुणाबद्दल बोलतेयस. काय बोलतेयस. जर हे तुझं वक्तव्य असेल, तर तुझी मुलं उद्या काय होणार? हा सुसंस्कृतपणा आपल्या महाराष्ट्रातून, देशातून जात चाललाय. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी केतकी चितळेचा समाचार घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT