Chief Minister Uddhav Thackeray
Chief Minister Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी सेनेतून काढून टाकलं; 'ठाकरी तोफ' धडाडली

दैनिक गोमन्तक

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या (Chipi Airport) उद्घाटनासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) एकत्र आले. दरम्यान राणे आणि मुख्यमंत्री यांच्यातील वाद अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. यातच आता पुन्हा एकदा राज्यातील राजकारणाचा महामेरु कोणत्या दिशेने लवणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, ''आजचा दिवस आदळाआपट करण्याचा नसून आनंद साजरा करण्याचा आहे. मातीचा काही संस्कार असून तो संस्कार मातीतचं जाणे महत्त्वाचे असते. कोकणाचं आणि शिवसेवेनेचं एक अतूट नात आहे. कोणी काय केले आणि कोणी काय करायचे ज्याचे त्याने ठरवावे. पर्यटन म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे गोवा. दरम्यान या चिपी विमानतळाच्या कामासाठी एवढा का वेळ लागला याचा आपण एक राजकारणी म्हणून सर्वांनी विचार केला पाहिजे.''

तसेच,कोकणाचं कॅलिफोर्निया करण्याचे अनेक नेत्यांनी बोलून दाखवले होते, मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कोकणाचं कॅलिफोर्निया करण्याचा मानस होता. मात्र कोण तळमळीने बोलतो, कोण पाठांतर करुन बोलणं हे सगळ्यांचं चांगलं माहित आहे म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नारायण राणे यांना टोला लगावला.

शिवाय, राज्यात इतर ठिकाणी काही मिळत नाही ते माझ्या कोकणात मिळते. माझा कोकण आता या विमानतळाच्या विकासाच्या माध्यमातून गरडभरारी घेणार आहे. तसेच कोकणातील जनतेपासून काहीच लपून राहत नाही. बाळासाहेबांना खोटं बोलणारी लोकं आवडत नव्हती, त्यावेळीच त्यांनी खोटं बोलणाऱ्या अशा लोकांना शिवसेनेतून काढून टाकले होते. विचाराला विरोध ठिक आहे मात्र पेढ्यातील गोडवा दाखवावा लागतो, अस म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर ठाकरी तोफ डागली. विकासामध्ये कोणीचं राजकारण आणू नये. आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करता आले पाहिजे. कोकणाचं ऐश्वर्य पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतील असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT