Chief Minister Uddhav Thackeray, Minister Aditya Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: 'ठाकरे पिता-पुत्र अन् संजय राऊतांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा'

सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि पक्षाचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी या तिन्ही नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जनहित याचिकेत करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. ठाकरे पिता-पुत्र आणि संजय राऊत यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेला न्यायालयाने स्थगिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी याचिकेत केली आहे. याशिवाय एकनाथ शिंदे गटाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्राच्या विविध भागात जाण्यावरही बंदी घालावी. (uddhav thackeray aditya thackeray and sanjay raut should book for sedition pil in high court)

दरम्यान, पाटील यांनी आपल्या याचिकेत म्हटले की, 'बंडखोर आमदारांना सुरक्षेचा धोका असल्याने ते गुवाहाटीला गेले आहेत. राऊत आणि ठाकरे यांच्याकडून सातत्याने धमक्या येत असल्याने जीव वाचवण्यासाठी ते तिथे गेले आहेत.'

हेमंत पाटील यांनी आपल्या याचिकेत पुढे म्हटले की, 'शिवसेनेत सुरु असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे कार्यकर्ते राज्याच्या विविध भागात आंदोलन करत आहेत. लोकांच्या मनात भीती निर्माण व्हावी म्हणून हा प्रकार घडत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून शिवसैनिक अनेक ठिकाणी हिंसाचार आणि दंगली करत आहेत.'

हेमंत पाटील यांनी याचिकेत पुढे असेही म्हटले आहे की, 'राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये केवळ उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सांगण्यावरुन आंदोलने केली जात आहेत. एवढंच नाही तर समाजकंटकांकडून सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान केले जात असून पोलीस मात्र सर्व काही मूकपणे पाहत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते, अशी स्थिती राज्यातील आहे. असे काही झाल्यास ठाकरे पिता-पुत्र आणि संजय राऊत जबाबदार असतील.' पाटील यांनी आपल्या याचिकेत पुढे म्हटले आहे की, 'केंद्र सरकारने (Central Government) बंडखोर आमदारांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे. यावरुन परिस्थिती योग्य नसून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याची केंद्र सरकारला काळजी असल्याचे स्पष्ट झाले आहे.'

शिवाय, पाटील यांनी अधिवक्ता आर.एन.कचवे यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत न्यायालयाने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश डीजीपींना द्यावेत, असे म्हटले आहे. यानंतर ठाकरे पिता-पुत्र आणि संजय राऊत यांच्यावर एफआयआर नोंदवावा. या लोकांनी राज्यात अराजकता पसरवण्यासाठी लोकांना प्रेरित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT