LGBT Marriage in Nagpur: 2 Girls Decided to Marry in Goa

 

Dainik Gomantak

महाराष्ट्र

LGBT Marriage: नागपुरातील 2 महिला डॉक्टर करणार गोव्यात लग्न

माझ्या वडिलांना 2013 पासून माझ्या सेक्सुअल ओरिएंटेशन माहिती होती

दैनिक गोमन्तक

नागपूर: महाराष्ट्रातील नागपुर (Nagpur) जिल्ह्यातील दोन महिला डॉक्टरांनी लग्न करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात एका 'कमिटमेंट रिंग सेरेमनी' (commitment ring ceremony) मध्ये या दोन महिला डॉक्टरांनी एकत्र राहण्याचा संकल्प केला. "आम्ही या नात्याला 'लाइफटाईम कमिटमेंट' म्हणतो आहे, आमच्या लग्नाचे पुढील नियोजन गोव्यात करत आहोत. माझ्या वडिलांना 2013 पासून माझ्या सेक्सुअल ओरिएंटेशन माहिती होती. मी नुकतेच माझ्या आईला सांगितले तेव्हा तिला धक्काच बसला पण नंतर तिनेही होकार दिला कारण तिला माझा आनंद जास्त महत्वाचा वाटतो, असे पारोमिता मुखर्जी (Paromita Mukherjee) यांनी सांगितले. (LGBT Marriage)

दुसरीकडे सुरभी मित्रा (Dr Surabhi Mitra) म्हणाली की, माझ्या घरच्यांकडून माझ्या सेक्सुअल ओरिएंटेशनला कधीच विरोध झाला नाही. खरं तर, जेव्हा मी माझ्या पालकांना सांगितले तेव्हा त्यांना आनंद झाला. मी एक मनोचिकित्सक आहे आणि बरेच लोक मला दुहेरी जीवन जगण्यास सांगतात कारण ते स्वत: साठी आपल्या आयुष्यासाठी स्टॅंड घेवू शकत नाही.(LGBT Marriage in Nagpur: 2 Girls Decided to Marry in Goa)

भेट कशी झाली?

गेल्या वर्षी डॉ. सुरभी मित्रा एका सेमिनारच्या संदर्भात कोलकाता येथे गेल्या होत्या, पारोमिता मुखर्जी त्या सेमिनारमध्ये प्रेक्षक म्हणून उपस्थित होत्या. डॉ. सुरभीच्या बोलण्याने आणि विचारांनी पारोमिता खूप प्रभावित झाली आणि इथूनच दोघांची ही प्रेमकहाणी सुरू झाली, पहिल्याच डेटला दोघीही चांगल्या मैत्रिणी झाल्या. जसजशी त्यांची मैत्री घट्ट होत गेली तसतसे त्यांच्यातील नाते फूलत गेले आणि त्या एकमेकींना आवडू लागल्या.

लॉकडाऊनच्या काळात फोन आणि व्हॉट्सअॅपवर त्यांचा कॉन्टॅक्ट सुरू होता. व्हिडिओ कॉलवर बोलणे सुरू झाले. यानंतर अखेर पारोमिता मुखर्जीने डॉ.सुरभी मित्राला लग्नासाठी प्रपोज केले. सध्या या दोघांची एंगेजमेंट झाली आहे. येत्या काही दिवसांत हे कपल गोव्यात लग्न करणार आहे. एका माध्यमांशी बोलताना आयुष्यभर एकमेकींना साथ देऊ असे दोघांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT