महाराष्ट्र

Guhagar Accident: गुहागर येथे दोन बसची समोरासमोर धडक, चालकांसह 25 ते 30 प्रवासी जखमी

गुहागर तालुक्यात आज सकाळी हा अपघात झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे (Guhagar, Ratnagiri) दोन बसची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात चालकांसह 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. चिपळूण धोपावे बस आणि गुहागर डेपोची बस समोरासमोर धडकल्याने हा अपघात झाला. अवघड वळणार हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. गुहागर तालुक्यात आज (सोमवारी) सकाळी हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, धोपावे-चिपळूण बस आणि गुहागर डेपोची बस विरुद्ध दिशेने येत होत्या. त्यावेळी एका अवघड वळणावर दोन्ही चालकांचं बसवरचे नियंत्रण सुटलं आणि बस एकमेकांवर आदळल्या. अपघातात बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. दोन्ही बसमधील चालकांना गंभीर दुखापत झाली. तर दोन्ही बसमधील 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत.

बसच्या चालकांना RGPPL च्या रुग्णालयात दाखल केलं आहे. इतर जखमींवरही उपचार सुरु आहेत. मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहे. गुहागर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT