Solapur  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Akluj: जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या नवरदेवाच्या आनंदावर विरजण, झाला गुन्हा दाखल

याप्रकरणी नवरदेवाच्या विरोधात अकलूजमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

Pramod Yadav

Akluj: अकलूजमधील (ता. माळशिरस) एका युवकाने चक्क दोन मुलींशी लग्न केले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मुली जुळ्या बहिणी आहेत. या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. पण, नवरदेवाच्या आनंदावर लग्नानंतर लगेच विरजण पडले आहे. याप्रकरणी नवरदेवाच्या विरोधात अकलूजमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

(Twin sisters from Mumbai get married to same man in Solapur)

अतुल अवताडे या महाळुंग परिसरात राहणाऱ्या तरुणाने 2 डिसेंबर रोजी अकलूज जवळील गलांडे हॉटेलमध्ये एकाच मांडवात रिंकी पाडगावकर आणि पिंकी पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला. याप्रकरणी माळेवाडी येथील राहुल फुले यांनी तक्रार दाखल केली आहे. नवरदेवाच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात NCR दाखल झाला आहे.

अतुलचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. सहा महिन्यांपूर्वी उच्चशिक्षित पिंकी, रिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्यानंतर अतुलने रुग्णालयात त्यांची काळजी घेतली होती. यातून त्यांचे प्रेम जुळले आणि नातेवाईकांच्या संमतीने काल हा विवाह अकलूज मध्ये पार पडला. इंजिनीअर असणाऱ्या रिंकी आणि पिंकी जुळ्या बहिणी असून, या दोघींचं शिक्षण एकत्रित झालं. त्यानंतर एकाच आयटी कंपनीत नोकरी देखील करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KKR ला दुसरा 'मोठा' झटका! हर्षित राणानंतर आता 'हा' मॅचविनर खेळाडू IPL 2026 मधून बाहेर

Goa HSSC Result 2026: काऊंटडाऊन सुरू! अवघ्या काही तासांत 12 वीचा निकाल; 'या' सोप्या स्टेप्समध्ये पाहा तुमचा रिझल्ट

Viral Video: 'डायपर'चा असाही वापर! कोल्ड-ड्रिंक थंड ठेवण्यासाठी तरुणाचा 'देसी जुगाड', पाहा कसं बनवलं घरगुती मिनी फ्रीज

पदार्पण असावं तर असं! 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 पदार्पणातच झळकावलं शतक, रचले दोन विश्वविक्रम Watch Video

VIDEO: निरीक्षक नाईक पुन्हा कोलव्यात, ग्रामस्थ संतप्त; आमदार व्हिएगस यांनी पोलिस अधीक्षकांना विचारला जाब

SCROLL FOR NEXT