Transport Minister Anil Parab Dainik Gomantak
महाराष्ट्र

अनिल परबांनी बोलावली तातडीची उच्चस्तरीय बैठक

अॅड. गुणरत्न सदावर्तेंची पोलीस कोठडीही संपली, आज होणार पुढील सुनावणी

दैनिक गोमन्तक

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेनंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज सोमवारी दुपारी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दुपारी साडे तीन वाजता ही तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. परबांनी बोलावलेल्या या बैठकीला परिवहन खात्याचे उच्चस्तरीय अधिकारी राहणार उपस्थित राहणार आहेत. परिवहनमंत्री अनिल परब यांच्या दालनात ही विशेष बैठक घेतली जाणार आहे.

एसटी कामगारांचा संप गेले पाच महिने सुरुच आहे. कामगारांनी केलेली विलीनीकरणाची मागणी अजूनही मान्य झाली नसली तरी इतर सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत. कोर्टाने दिलेल्या आदेशानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला (Attack) केला. यानंतर हे प्रकरण आणखी चिघळल्याचं दिसत आहे. पवारांच्या घरावर हल्ल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेता येणार नाही , असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी आधीच घोषित केलं आहे.

आज होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष असेल. दरम्यान एसटी महामंडळाकडूनही 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचं परिपत्रक काढण्यात आलं आहे. आजच्या या उच्चस्तरीय बैठकीत काय चर्चा केली जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. दुसरीकडे हल्लेखोर कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दुसरीकडे एसटी कामगारांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस (Police) कोठडी आज संपणार आहे. मागील काही दिवसांपासून एसटी संपातील कर्मचाऱ्यांच्या वतीने अॅड. गुणरत्न सदावर्ते कोर्टात बाजू मांडत आहेत. पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना आज पुन्हा मुंबई मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टापुढे (Court) हजर केलं जाईल. त्यांच्याविरोधात सबळ पुरावा शोधण्याचं काम मुंबई पोलिसांकडून सुरु आहे. तपासासाठी पोलिसांचं पथक सदावर्तेंच्या घरी गेलं होतं. सदावर्तेंच्या वकिलांनी पोलिसांना झालेल्या मारहाणीचा आरोप फेटाळून लावत पुरावे सादर करण्याचीही मागणी कोर्टात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif: भारताला शत्रू म्हटले, युद्ध जिंकल्याचा केला दावा, शेवटी शांततेसाठी मागितली भीख; पाकच्या पंतप्रधानांचा युएनमध्ये थापांचा पाऊस

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT