Tragic death of senior Shivshahir Babasaheb Purandare Dainik Gomantak
महाराष्ट्र

जेष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे दु: खद निधन

वयाच्या 100 व्या वर्षी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दैनिक गोमन्तक

जेष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज दु: खद निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शिवचरीत्र उभ्या महाराष्ट्रामध्ये घराघरात पोहोचवणाऱ्या आपल्या वक्तृत्वाने मराठी माणसांना त्यांच्यात वीरश्री अन राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचा तब्बल साठहून अधिक वर्षे प्रयत्न करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक होती असून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. कालच रुग्णालय प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले होते की, बाबासाहेब गेल्या आठवडापासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांना न्युमोनियाची लागण झाली होती.

बाबासाहेबानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर (Shivaji Maharaj) राजा शिवछत्रपती ग्रंथांची निर्मिती केली आहे. त्या ग्रंथास वाचकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. केवळ महाराष्ट्रात नाहीतर देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे चाहते आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात बाबासाहेबानी लिहिलेले शिवचरित्र यांची चर्चा असते. लहानांपासून ज्येष्ठांपर्यत सर्वांनी शिवचरित्राचे पारायण केले. बाबासाहेब हे शिवव्याख्याते म्हणून त्यांची लोकांना ओळख झाली. आणि त्यांच्या शिवचरित्राला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT