Gaganbawda Kolhapur National Highway Dainik Gomantak
महाराष्ट्र

Gaganbawda Kolhapur National Highway: गगनबावडा-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सलग तिसऱ्या दिवशी ठप्प; पावसाचा जोर कायम!

Gaganbawda Kolhapur National Highway: कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या पावसानं धूमशान घातलं आहे.

Manish Jadhav

कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या पावसानं धूमशान घातलं आहे. विशेषत: कोकणात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. येथील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये पावसानं थैमान घातलं आहे. सलग तिसऱ्या दिवशी गगनबावडा-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. या महामार्गावरील खोकुर्ले, मांडुकली, किरवे दरम्यान रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने ही वाहतूक ठप्प झाली.

दरम्यान, कोल्हापुरात सध्या पडत असलेल्या मुसळधारा पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. तर कुंभी नदीच्या आलेल्या पुरामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे.

गगनबावडा- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मांडुकली खोकुर्ले दरम्यान पुराचे पाणी आल्याने रविवारपासून वाहतूक विस्कळीत आहे. या महामार्गावरील वाहतूक सध्या राधानगरीमार्गे वळवण्यात आली आहे.

तर दुसरीकडे, कोकणात (Konkan) जाणारी वाहतूक फोंडा घाट मार्गे वाळवण्यात आली. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

तसेच, गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील राजापूर शहरात पुन्हा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळी प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत पोहोचले आहे. तर अर्जुना नदीपात्रात असलेलं पुंडलिक मंदिरही पाण्याखाली गेलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 2nd Test: 'करो या मरो' कसोटीत भारत रचणार इतिहास, वर्ल्ड क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा ठरणार तिसरा देश; इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या यादीत होणार सामील

Ranji Trophy 2025: गोव्याने पत्करला डावाने दारुण पराभव, रणजी क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा सामना गमावला; सौराष्ट्राची प्रगती

अग्रलेख: हॉटेल, रेल्वे, रस्ते... सर्वत्र ट्रॅकिंग! गोव्यात 'चोरांचा माग' काढण्यासाठी 'रियल-टाईम' प्रणाली आवश्यक

125 वर्षांची कोकणी कला लंडनमध्ये! वर्षा उसगावकर यांनी सादर केलं 'तियात्र'; Video Viral

अग्रलेख: 'घर घर मे दिवाली है, मेरे घर मे अंधेरा' गोमंतकीय सिनेकर्मींची अवस्था

SCROLL FOR NEXT