Goa Crime Morjim Hotel Rape Case:  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Goa Crime: मोरजीत महाराष्ट्रातील पर्यटक महिलेवर बलात्कार; हॉटेल रूममधून प्रियकर बाहेर गेला अन् अज्ञात तरूण घुसला

खिडकीतून उडी मारून पोबारा; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Akshay Nirmale

Goa Crime Morjim Hotel Rape Case: महाराष्ट्रातील एका 30 वर्षीय महिला पर्यटकावर बुधवारी रात्री गोव्यातील मोरजी येथील हॉटेलमध्ये बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. हॉटेलच्या रूममध्ये त्या महिलेशिवाय कुणी नसल्याचे पाहून एका अज्ञात व्यक्तीने थेट रूममध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस सध्या त्याचा शोध घेत आहेत. विठ्ठलदास वाडा मोरजी येथील हॉटेलमध्ये पहिल्या मजल्यावरील रूममध्ये रात्री दोनच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. संबंधित पीडित महिला मूळची सातारा (महाराष्ट्र) येथील आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही पर्यटक महिला प्रियकर आणि मैत्रिणींसोबत बुधवारी गोव्यात आली होती. तिचा प्रियकर तिच्या खोलीतून बाहेर पडला तेव्हा ती झोपली होती. तेव्हा अचानक एका अज्ञाताने तिच्या रूममध्ये प्रवेश केला.

झोपेत असतानाच संबंधित व्यक्तीने तिच्याशी शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेलाही सुरवातीला तिचा प्रियकरच परत आला, असे वाटले, त्यामुळे तिनेही त्याला सहकार्य केले.

पण जेव्हा तिच्या लक्षात आले की तो कुणीतरी अज्ञात इसम आहे, तेव्हा तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. तिने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण काळोखाचा फायदा घेत आरोपीने हॉटेल रूमच्या खिडकीतून उडी मारून पोबारा केला. अज्ञात व्यक्तीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vinoo Mankad Trophy: गुजरातचा गोव्यावर दणदणीत विजय! 5 लढतीतील चौथा पराभव; गटसाखळीत हाराकिरी

Goa Today's News Live: वीज कोसळून 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू? कोलवा येथे रुमच्या बाहेर आढळला मृतदेह

Netravali: 'एसी'त बसणारे ग्रामीण जनतेला सुखाने जगू देत नाहीत! व्‍याघ्र प्रकल्‍पावरुन फळदेसाईंचा टोला; नेत्रावळी ग्रामस्थांचा विरोध

Rama Kankonkar: 'मोबाईलचा डेटा फॉरमॅट का केला'? हल्लाप्रकरणी रामा, जेनिटोंचे वकील भिडले; अटक बेकायदेशीर असल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; दिगंबर कामत लहान कसे?

SCROLL FOR NEXT