SambhajiRaje On BJP: महाराष्ट्र विधान परिषदेतील भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या नव्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी भाजपला धारेवर धरण्यास सुरवात केली आहे. त्यातच आता या मुद्याववरून माजी खासदार संभाजीराजे यांनीही थेट महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वावर टीका केली आहे. आमदार प्रसाद लाड हा मुर्ख माणूस आहे, अशी टीका संभाजीराजे यांनी केली आहे.
आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे वक्तव्य केले. त्यावर बोलताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, लाड यांचे वक्तव्य अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. त्यांनी या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. लाड यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. ते जमत नसेल तर त्यांना महाराष्ट्रातून काढून टाकले पाहिजे.
संभाजीराजे म्हणाले की, “प्रसाद लाड यांचे वक्तव्य मी ऐकले. शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असे ते म्हणत आहेत. हे दुर्दैव आहे. त्यांचा अभ्यास अपूर्ण आहे. प्रसाद लाड हे जबाबदार व्यक्तिमत्त्व आहेत. ते आमदार आहेत. मात्र शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचे ते म्हणत आहेत. ही शरमेची बाब आहे. मी त्यावर काय बोलणार. त्यांनीच याबाबत उत्तर द्यावे. लाड यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यांना हे जमत नसेल तर त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढून टाका.”
“प्रसाद लाड एकीकडे ते शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत, आमची अस्मिता आहेत, असे सांगतात. तर दुसरीकडे असे वक्तव्य करतात. नुसती माफी मागी मागून चालणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालावे,” असेही संभाजीराजे म्हणाले.
काय म्हणाले होते आमदार प्रसाद लाड?
संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले, रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे सुरुवात कोकणात झाली,’ असे वक्तव्य प्रसाद लाड यांनी केले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.