Sharad Pawar  Dainik Gomantak
महाराष्ट्र

...म्हणून काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी शक्य नाही: शरद पवार

दैनिक गोमन्तक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत मोठे विधान केले आहे. काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी शक्य नाही, त्यामुळे काँग्रेसला सोबत घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. (Third front is not possible without Congress says Sharad Pawar)

काँग्रेस (Congress) आजही देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून देशाच्या राजकारणात त्याचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर लोक नाराज आहेत, असे शरद पवारांना विचारले असता पवार म्हणाले की, सर्वांना एकत्र बसून बोलावे लागेल. याशिवाय 3 मे पर्यंत मशिदींमधील लाऊडस्पीकर बंद करण्याच्या मनसेने राज्य सरकारला दिलेल्या इशाऱ्यावरही शरद पवार यांनी आज राज ठाकरेंना सल्ला दिला. याचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करावा, असे ते म्हणाले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी देखील भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. फेब्रुवारी महिन्यात केसीआर यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची भेट घेतली होती.

ते म्हणाले होते की, अनेक विषयांवर आमची चर्चा झाली. अनेक गोष्टींवर आमचे एकमत झाले आहे. आम्ही भविष्यात एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात आपले अनेक भाऊ आहेत, त्यांच्याशी मी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत होतो. यापुढे आपण सर्वजण हैदराबाद आणि इतर ठिकाणी एकत्र चर्चा करू, असे ते म्हणाले होते. देश चालवण्याच्या पद्धतीत बदल व्हायला हवा. आम्हाला दडपशाही आणि बेकायदेशीर कृतींविरुद्ध लढायचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT