रामदास आठवले  Dainik Gomantak
महाराष्ट्र

...तर फडणवीस मुख्यमंत्री असते- रामदास आठवले

मुंबईत आज पार पडलेल्या "सन्मान देवदूतांचा" या कार्यक्रमात रामदास आठवलेंचे हे विधान ऐकायला मिळाले

दैनिक गोमन्तक

माझं जर फडणवीसांनी(Debvendra Fadnvis) ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते असे विधान केले आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले(Ramdas Athawale) यांनी एका कार्यक्रमात केले आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकींनंतर सेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरुन अडचण निर्माण झाली त्यानंतर नेने भाजपशी काडीमोड घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आपला नवा संसार थाटला. सत्तासंघर्षाच्या याच काळात मी फडणवीसांना सल्ला दिला होता की शिवसेनेला अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद देऊन टाका… माझं जर ते म्हणणं फडणवीसांनी ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते, असे आठवले म्हणाले.

पण एवढंच बोलून थांबले असते तर तर ते आठवले कसे त्यांनी आपल्या वेगळ्या शैलीत "जर तुमच्या दोघांच्यात एकमत होत नसेल तर मला मुख्यमंत्री करा, असंही त्यावेळी मी सांगितलं होतं," याची आठवण ही त्यांनी सगळ्यांना करून दिली.

मुंबईत आज पार पडलेल्या "सन्मान देवदूतांचा" या कार्यक्रमात आठवलेंचे हे विधान ऐकायला मिळाले या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या अनोख्या शैलीत सत्तधारी तसेच विधोपक्ष यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली.

तर कोरोना काळात राज्याची आरोग्य परिस्थी हाताळण्यासाठी काम कारणाने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे देखील रामदास आठवले यांनी आपल्याच शैलीत तोंडभरून कौतुक करत त्यांनी कोरोनाकाळात उत्तम काम केलंअसे सांगत राजेश टोपे यांच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली.

'कोरोनच्या काळात आरोग्य खातं चालवणे नव्हते सोपे, पण त्याला पुरुन उरले राजेश टोपे…', अशा शब्दात खास आठवले स्टाईलमध्ये त्यांनी आरोग्यमंत्र्यांचं कौतुक केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT