Uttar Pradesh: ओवेसींचे आव्हान योगिनीं स्वीकारलं

उत्तर प्रदेशच्या(Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीला आणखीन बराच अवधी असला तरी राज्यातील राजकारण आत्तापासूनच तापत आहे. युती, आघाड्या, आरोप, प्रत्यारोप या सगळ्या गोष्टींनी उत्तर प्रदेश मध्ये धुमाकूळ घातलेला दिसतोय
Uttar Pradesh Yogi accepted Owesi's challenge
Uttar Pradesh Yogi accepted Owesi's challengeDainik Gomanatk
Published on
Updated on

उत्तर प्रदेशात(Uttar Pradesh) योगींना(Yogi Adityanath) पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही असे सांगत एआयएमआयएमचे(AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी(Asaduddin Owaisi) यांनी उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडवून दिली आहे. ओवेसी यांच्या पक्षाने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये ओवैसी सांगत आहेत की योगींना पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होऊ देणार नाही. पण याचाच समाचार घेत आता ओवेसी यांच्या या आव्हानावर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २०२२ मध्ये राज्यात भाजपचे सरकार बनवण्याचा दावा करत म्हणाले की आम्ही त्यांचे आव्हान स्वीकारतो.असे सांगत योगी आदित्यनाथ यांनीही दंड थोपटले आहेत.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "असदुद्दीन ओवैसी हे आपल्या देशाचे एक मोठे नेते आहेत. त्यांनी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीसाठी जर भाजपला आव्हान दिले असेल तर भाजपा(BJP) कार्यकर्ते हे आव्हान स्वीकारतील. यात शंका नाही. २०२२ मध्ये राज्यातभाजपचं उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करेल. "असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Uttar Pradesh Yogi accepted Owesi's challenge
जेलमध्ये असलेला 'सुशिल कुमार' म्हणतोय मला टीव्ही पाहाचाय

तसेच नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सपा सुप्रीमो अखिलेश यादव यांनी प्रशासकीय सत्तेचा गैरवापर केल्याच्या आरोप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार आरोप केला आहे. याच आरोपाला उत्तर देत योगी म्हणाले की आम्ही जेव्हा लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका जिंकतो तेव्हा ईव्हीएमची चर्चा होते.असे म्हणतात की बॅलेट पेपरमध्ये निवडणुका घेण्यात याव्यात. आता बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका झाल्या आहेत, त्यांनी प्रशासनावर आरोप करण्यास सुरवात केली असून हे चुकीचे आहे.

तसेच जिल्हा पंचायत अध्यक्ष निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल योगी यांनी भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत . ते म्हणाले की, हे भाजप कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचे फळ आहे. जिल्हा पंचायत अध्यक्ष निवडणुकीत भाजपाने 53 पैकी 46 जागा जिंकल्या आहेत. समाजवादी पार्टीला 4 जागांवर समाधान मानावे लागले. आरएलडीला एक जागा आणि एक राजा भैया यांच्या पक्षाला एक जागा मिळाली. यापूर्वी भाजपाने 21 जागा जिंकल्या असून समाजवादी पक्षाने एक जागा बिनविरोध जिंकली आहे. अशा प्रकारे 75 जागांपैकी 67 जागा भाजपच्या खात्यात आल्या आहेत.

एकूणच काय तर उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीला आणखीन बराच अवधी असला तरी राज्यातील राजकारण आत्तापासूनच तापत आहे. युती, आघाड्या, आरोप, प्रत्यारोप या सगळ्या गोष्टींनी उत्तर प्रदेश मध्ये धुमाकूळ घातलेला दिसतोय या बरोबरच आता यूपी निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या पार्टी अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) च्या प्रवेशामुळे राजकीय गोंधळ वाढला आहे अशातच आता ओवेसींच्या या आव्हानाने उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत नवीन रंगात येणार हे नक्की.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com