Suresh (Balu) Dhanorkar Dainik Gomantak
महाराष्ट्र

खासदारांच्या बंगल्यात चोरीचा प्रयत्न; तिघे गजाआड

चोरट्यांनी खासदाराच्या बंगल्याच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

दैनिक गोमन्तक

चंद्रपूर: येथे काँग्रेस (Congress) खासदार बाळू धानोरकरांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पोलिस यंत्रणा तातडीने कमाला लागली. त्यांनी या प्रकरणात तिघांना अठक केली आहे.

चोरट्यांनी खासदाराच्या बंगल्याच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरीच्या हेतूने घरात घुसलेल्या चोरांच्या हाती काहीही लागले नाही. परिणामी संतापलेल्या चोरांनी बंगल्यातील वस्तूंची नासधूस केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

धानोरकरांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून त्यांनी याआधी दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. बंगल्यामधील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांना चोरांना पकडण्यात यश आले. या बंगल्यामध्ये कोणातेही मौल्यवान साहित्य नसल्याने चोरांचा हाती काहीही लागले नाही. मात्र चोरांनी बंगल्यात फार नासधूस केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cooperative Societies: राज्यातील 42% सहकारी सोसायट्या बंद, 42% सोसायट्या तोट्यात; सहकार क्षेत्राच्या आर्थिक सक्षमतेवर केंद्रीय सहकारमंत्र्यांकडून प्रश्नचिन्ह

Goa Fisheries Projects Pending: गोव्याच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राला निधीचा फटका! 53 कोटी मिळाले; पण 6 वर्षांत अवघे 47 कोटीखर्च, केंद्रीयमंत्र्यांचा संसदेत खुलासा

National Education Policy Goa: पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 10 वी अन् 11वीतही 'NEP' लागू होणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Goa Assembly Three Day Session: सहा महिन्यांचा हिशेब ३ दिवसांत! विरोधी पक्षनेत्यांची टीका, 31ऑगस्‍ट ते 2 सप्‍टेंबर अल्प कालावधीचे अधिवेशन

Student Protest Firing Allegations: 'गृहमंत्र्यांनीच दिला आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश!' लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक मंजूर, विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपाने संसदेत गदारोळ

SCROLL FOR NEXT