अमोल मिटकरी  Dainik Gomantak
महाराष्ट्र

सिल्व्हर ओक हल्ल्याचा मास्टर माईंड नागपूरात?

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना दुसऱ्यांदा पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र: दोन दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानावर आंदोलन सुरू होतं कर्मचारी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानाबाहेर हल्ला केला यावेळी आंदोलकांनी तुफान दगडफेक चप्पल फेक करत गोंधळ घातला संबंधित प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. (The mastermind of the Silver Oak attack in Nagpur)

पवार यांच्या घरावर चा हल्ला पूर्वनियोजित होता पवार यांच्या घरावर हल्ला करण्याचा कट आधीच रचला होता. हल्ल्यामागे काही पत्रकारांचा समावेश आहे. असे गंभीर आरोप सरकारी वकिलांनी कोर्टात केले आहेत. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना दुसऱ्यांदा पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दोन नवीन नावं समोर अली आहेत. त्यातील पहिले नाव चंद्रकांत सूर्यवंशी आणि दुसरं नाव सच्चिदानंद पुरी आहे. यांच्या युट्युब अकाउंटवरिल व्हिडिओ डिलीट केल्याचाही दावा सरकारी वकिलांनी केला.

6 एप्रिल एक मीटिंग झाली होती त्यात पवार यांच्या घरावर हल्ला करण्याचे ठरवले गेले अभिषेक पाटील नावाचा एसटी कर्मचारी सदावर्ते यांच्या संपर्कात होता हल्ल्याची माहिती काही पत्रकारांना आधीच देण्यात आली होती चंद्रकांत सूर्यवंशी नावाचा व्यक्ती न्यूज चॅनल चालवत होता तो सदावर्ते यांच्या संपर्कात होता. सदावर्ते यांनी चंद्रकांत सूर्यवंशी यांना ही कॉल केला होता या दोघांमध्ये व्हाट्सअप कॉल देखील झाला. गुणरत्न सदावर्ते यांची कोठडी वाढवली असून या प्रकरणात आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली असुन, या सगळ्याचा मास्टरमाईंड नागपूरचा (Nagpur) असल्याचे स्पष्ट केले आणि लवकरच त्याचे नाव समोर येईल असे देखील ते म्हणाले

हल्ल्याच्या दिवशी दोन कॉल हे नागपूरमधून

हल्ल्याच्या दिवशी दोन कॉल हे नागपूरमधून आले होते यावरूनच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले की या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माईंड हा नागपुरताच असल्याचे सिद्ध होतंय हे नाव लवकरच पुढे येईल असे ते म्हणाले, दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनामागे षडयंत्र असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला या प्रकरणासंबंधी अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांचे नागपूरच्या एका व्यक्तीशी बोलणे झाले असल्याचे चॅट मधून स्पष्ट झाले आहे. अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात मांडली न्यायालयात मांडली पोलिसांच्या (Mumbai Police) तपासातून नागपूरच्या एका व्यक्तीचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे या प्रकरणासंबंधी 6 तारखेला मीटिंग झाली होती या मिटिंग मध्ये काही पत्रकार देखील उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंत्री माविन, बाबूश यांना दिलासा, 'त्‍या' बहुचर्चित प्रकरणांना आव्‍हान न देण्‍याचा पोलिसांचा निर्णय

Goa Cyber Crime: दररोज 15 गोमंतकीय सायबर जाळ्यात! गुन्हेगारीचा वाढतोय फास; राज्यात सहा महिन्यांत 2,637 जणांना गंडा

Amit Shah Goa visit: भाजपच्या हालचालींना वेग; अमित शहा 7 सप्टेंबरला गोव्यात, बी. एल. संतोषही पुढील महिन्यात दौऱ्यावर

Sexual Assault Case: 4 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, खोर्ली-म्हापशात घृणास्पद कृत्य; स्थानिकांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या दिलं ताब्यात

Horoscope: रवि प्रदोष आणि मासिक शिवरात्रीचा दुहेरी योग! 'या' राशींवर महादेवांची विशेष कृपा, यश-समृद्धीचे संकेत

SCROLL FOR NEXT