अजित पवार
अजित पवार  Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाविकास आघाडीला उगाच बदनाम केल जातंय; अजित पवार

दैनिक गोमन्तक

अनेक दिवसांपासून OBC आरक्षण आणि त्याचा इम्पेरिकल डेटा (Imperial data)यावरून सत्ततेतील नेते आणि विरोधक यांच्यात सतत आरोप-प्रत्यारोप हे करत आहेत. या बाबत राज्य सरकारकडून ओबीसी आरक्षणाची इम्पेरिकल डेटाची मागणी ते करीत आहेत. आणि केंद्राकडून मात्र त्याबाबतचा डेटा पाठवण्यास टाळाटाळ सुरु आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) याबाबत सुनावणी केली, त्या मध्ये केंद्र सरकारने त्यांची भूमिका मांडताना त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. आणि त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर सडेतोड उत्तर दिले. “महाविकास आघाडी सरकारला विनाकारण बदनाम केले जात आहे. मात्र आता त्याबाबतची सर्व वस्तुस्थिती समोर आली आहे”, असे अजित पवारांनी सांगितले.

OBC आरक्षणावर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसेच, केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र मिळाल्यानंतर त्यावर आम्ही आमची भूमिका मांडू, असे देखील यावेळी अजित पवार संगितले. केंद्राने त्यांची भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. त्यानंतर ते म्हणत आहेत की इम्पेरिकल डेटा आम्ही देऊ शकत नाही. मात्र याबाबतची वस्तुस्थिती समोर येत आहे. इतके दिवस विनाकारण महाविकासआघाडी बदनाम(Notoriety) करण्यात येत आहे. आणि काही मंडळीचा ही प्रयत्न सुरु आहे. आणि त्याबाबतची सुद्धा वस्तुस्थिती सामान्य नागरिकांसमोर येत आहे. असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : दोन्‍ही जागा ‘इंडिया’च जिंकणार! विरियातो फर्नांडिस

Siolim News : देशाच्या अधोगतीस काँग्रेस जबाबदार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Israel Hamas War: इस्रायलचा गाझावर पुन्हा हवाई हल्ला, अनेक घरांवर डागली क्षेपणास्त्रे; लहान मुलांसह 13 जणांचा मृत्यू

Goa News : राज्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान अपेक्षित! सदानंद शेट तानावडे

Crime News : काणकोणात बारचालकाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाजवळ गावठी बॉम्ब, काडतुसेही सापडल्याने तर्कवितर्क

SCROLL FOR NEXT