The historic double decker bus bid farewell to Mumbaikars Dainik Gomantak
महाराष्ट्र

9 दशकांचा प्रवास संपला... ऐतिहासिक डबल डेकर बसने घेतला मुंबईकरांचा निरोप

1990 च्या दशकापासून पर्यटकांसाठी प्रेक्षणीय स्थळ म्हणून काम करणाऱ्या ओपन-डेक डबल-डेकर बस आजपासून शहराच्या रस्त्यावरून मुंबईकरांचा निरोप घेतील.

Ashutosh Masgaunde

The journey of 9 decades is over... The historic double decker bus bid farewell to Mumbaikars:

आठ दशकांहून अधिक काळ शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अविभाज्य भाग असलेल्या मुंबईच्या प्रतिष्ठित लाल डबलडेकर बसची सेवा शुक्रवारपासून (१५ सप्टेंबर) बंद झाली, असे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

1990 च्या दशकापासून पर्यटकांसाठी प्रेक्षणीय स्थळ म्हणून काम करणाऱ्या ओपन-डेक डबल-डेकर बस शुक्रवारपासून शहराच्या रस्त्यावरून गायब होतील, असे ते म्हणाले.

या बसची सेवा कायमस्वरूपी बंद होत असल्याने काही प्रवासी संघटना आणि बसप्रेमींनी, बेस्ट प्रशासनाने यापैकी किमान दोन बस आपल्या डेपोस्थित संग्रहालयात जतन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री आणि बेस्ट प्रशासनाला पत्रही लिहिले आहे.

"सध्या बेस्टच्या ताफ्यात तीन ओपन डेक बसेससह अवघ्या सात डबलडेकर बस उरल्या आहेत. ही वाहने त्यांच्या कोडल लाइफची 15 वर्षे पूर्ण करत असल्याने, डबल डेकर बस 15 सप्टेंबरपासून कायमस्वरूपी बंद होतील तर ओपन-डेक बस 5 ऑक्टोबर रोजी बंद करण्यात येतील," असे बेस्टच्या प्रवक्त्याने सांगितले.

लाल डबल-डेकर बसस 1937 मध्ये शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुरू केल्या गेल्या आणि तेव्हापासून त्या शहराचेच प्रतीक बनल्या आहेत. विशेष म्हणजे बॉलीवूड चित्रपटांच्या अनेक गाण्यांमध्येही त्या दाखवल्या गेल्या आहेत.

1990 च्या दशकाच्या सुरुवातीला, बेस्टकडे सुमारे 900 डबल डेकर बसस होत्या, परंतु 90 च्या दशकाच्या मध्यानंतर ही संख्या हळूहळू कमी होत गेली.

उच्च परिचालन खर्चाचा दाखला देत, बेस्ट प्रशासनाने २००८ नंतर डबलडेकर बसेस समाविष्ट करणे बंद केले. बेस्टने या वर्षीच्या फेब्रुवारीपासून या ऐतिहासिक बसेसच्या जागी बॅटरीवर चालणाऱ्या लाल आणि काळ्या डबलडेकर बसेस आणण्यास सुरुवात केली आणि सध्या अशा सुमारे २५ बस चालवल्या जात आहेत.

"नवीन डबल-डेकर ई-बस वातानुकूलित असल्याने, जुन्या बसमध्ये समोर बसणे आणि उघड्या खिडक्यांमधून वाऱ्याची झुळूक चेहऱ्यावर घेत प्रवास करण्याची संधी आता पुन्हा मिळणार नाही," असे एक उत्साही प्रवासी म्हणाला.

सार्वजनिक सेवेत इतक्या डबल डेकर बस असलेले मुंबई हे देशातील एकमेव शहर आहे. त्यामुळे या ऐतिहासिक बस जपल्या गेल्या पाहिजेत. जगातील प्रत्येक मेट्रो शहरात परिवहन संग्रहालय आहे, परंतु मुंबईत एकही नाही आणि या बसेसचे जतन करणे हे या दिशेने एक पाऊल ठरेल. असे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT