Mumbai Dainik Gomantak
महाराष्ट्र

कोरोनाच्या नव्या XE व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला मुंबईत

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे.

दैनिक गोमन्तक

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. याच पाश्वभूमीवर ओमिक्रॉनच्या नवीन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण मुंबईत (Mumbai) आढळून आला आहे. इथे Omicron Variant च्या XE व्हेरिएंटच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली आहे. त्याच वेळी, ओमिक्रॉनच्या कप्पा व्हेरिएंटचाही पहिला रुग्ण आढळून आला आहे. आरोग्य खात्याकडून 376 नमुने यावेळी तपासण्यात आले. त्यापैकी 230 मुंबईचे रहिवासी आहेत. तथापि, नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत.

दरम्यान, मुंबईतील या 230 रुग्णांपैकी 21 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लसीचा पहिला डोस घेतलेल्या रुग्णांपैकी एकाही रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. परंतु ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले त्यापैकी 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे, मात्र लसीचा डोस न घेतलेल्या 21 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 21 रुग्णांपैकी कोणालाही ऑक्सिजन किंवा अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेले नाही.

तसेच, नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात सांगितले होते की, XE व्हेरिएंट कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा जास्त संसर्गजन्य असू शकतो. XE हे BA'1 आणि BA.2 Omicron चे 'रीकॉम्बिनंट' उत्परिवर्तन आहे. जेव्हा एखाद्या रुग्णाला कोरोनाच्या अनेक व्हेरिएंटचा संसर्ग होतो तेव्हा 'रीकॉम्बीनंट' उत्परिवर्तन उद्भवते.

याशिवाय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (World Health Organization) पुढे सांगितले की, 'नवीन व्हेरिएंट XE ओमिक्रॉनच्या BA.2 च्या उप व्हेरिएंटपेक्षा 10 टक्के जास्त संसर्गजन्य आहे.' डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, ''प्राथमिक अंदाज BA.2 पेक्षा 10 टक्के जास्त संसर्गजन्य असल्याचे सूचित होते. तथापि, यासाठी आणखी पुष्टीकरण आवश्यक आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT