Gulabrao Patil Dainik Gomantak
महाराष्ट्र

धनुष्यबाण आमचाच आहे - आमदार गुलाबराव पाटील

शिवसेनेचा धनुष्यबाण ही जाणार ?

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बहूमताला विधानसभेत सुरुंग लागला. याचा परिणाम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले. आता शिवसेनेचे चिन्ह असलेला धनुष्यबाण उद्धव ठाकरे गटाकडून जाणार की काय ? अशी स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी यावर मोठं विधान केले आहे.

( The bow and arrow which is the symbol of Shiv Sena is ours; MLA Gulabrao Patil )

हा उठाव शिवसेनेचा अंतर्गत

आमदार गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही अद्याप शिवसेना सोडलेली नाही, त्यामुळे धनुष्यबाण हा आमचाच आहे, असं विधान त्यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना गुलाबराव पाटलांनी हे विधान केलं आहे.

त्यामूळे शिवसैनिकांना ही प्रश्न पडला आहे की धनुष्यबाण नेमका कोणाचा आहे ? यावेळी शिवसैनिकांना न्यायालयात काय निर्णय होईल ? असं विचारलं असता, गुलाबराव पाटील म्हणाले की, अशा स्थितीत सामान्यत: डोकी मोजली जातात आणि डोक्यांनाच महत्त्व असतं. यातच आम्ही शिवसेना सोडलेली नाही. त्यामुळे असा संभ्रम कुणी तयार करत असेल तर तो करू नये. आम्ही पार्टी सोडलेली नाही. आम्ही पार्टीच्या अंतर्गत हा उठाव केलेला आहे. असे ही ते म्हणाले.

त्यामुळे धनुष्यबाण हा आमचाच

धनुष्यबाण आमचाच असे म्हणताना पाटील म्हणाले की, आम्ही शिवसेना पक्ष सोडलेला नाही, त्यामुळे धनुष्यबाण हा आमचाच राहणार आहे. पक्ष सोडला असता तर धनुष्यबाण कोणाचा ? असा प्रश्न पडला असता. मात्र, तसे काहीही झालेले नाही. त्यामूळे धनुष्यबाण हा आमचाच आहे. असे ते म्हणाले शिवसेना पक्षानं नैसर्गिक युती करावी, अशी मागणी आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांकडे केली होती. बहुतांशी आमदारांनी हीच मागणी केली होती. पण ही मागणी न ऐकल्यामुळे आम्हाला हा उठाव करावा लागला. असं मोठं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT