Thane Court issue Non bailable warrant against former Mumbai Police Commissioner Parambir Singh Dainik Gomantak
महाराष्ट्र

परमबीर सिंग फरार, कोर्टाचं अजामीनपात्र वॉरंट जारी

ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी ठाणे पोलिसांना परमबीर सिंगला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहेत .

दैनिक गोमन्तक

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) परमबीर सिंग (Parambir Singh)यांच्याविरोधात सरकारने आता एक मोठी ऍक्शन घेतली आहे. महाराष्ट्र सरकारच्या हातावर तुरी देत परमबीर सिंग अनेक दिवसांपासून गायब आहेत. आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट (Non bailable warrant) जारी करण्यात आले आहे. कागदपत्रांवरून परमबीर सिंग दोन महिन्यांपासून फरार असले तरी प्रत्यक्षात सुमारे साडेपाच महिन्यांपासून त्याचा ठावठिकाणा नाही. म्हणजे यंत्रणा सांभाळण्याची जबाबदारी असलेला अधिकारीच गायब झाल्याने यंत्रणांचे अपयश समोर येत आहे. (Thane Court issue Non bailable warrant against former Mumbai Police Commissioner Parambir Singh)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यावर 26 ऑक्टोबर ही तारीख नोंदवली असून, त्यात ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी ठाणे पोलिसांना परमबीर सिंगला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहेत . मुंबई पोलीस परमबीरचा शोध घेत आहेत, महाराष्ट्राची CID शोधत आहे, NIA शोधत आहे, पण परमबीर सिंग बेपत्ताच आहेत .

परमबीर सिंगांवर नेमके कोणते आरोप आहेत

परमबीर सिंग रजेवर गेल्याच्या दिवसापासून म्हणजेच ५ मे रोजीत्यांच्यावर तीन व्यावसायिकांकडून कोट्यवधींची खंडणी वसूल केल्याच्या आरोप ठेवण्यात आला होता. दुसरा गुन्हा 22 जुलै रोजी परमबीर सिंग यांच्यावर 15 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर 30 जुलै रोजी खंडणी व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला त्याचबरोबर 20 ऑगस्ट रोजी वसुलीचा आणखी एक गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला. 27 सप्टेंबर रोजी ठाण्यातही खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता.

तर दुसरीकडे अँटिलिया प्रकरणाचे एक टोक परमबीर सिंग यांच्याशीही जोडले जाते, जे आधीच खंडणीच्या चक्रव्यूहात अडकले आहेत . दहशतवाद्यांनी अँटिलियासमोर स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याची बातमी आली होती. मात्र तपासाअंती महाराष्ट्र पोलिसांचे सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे याच्या मुसक्या आवळल्या आणि त्यानंतर हे प्रकरण 100 कोटींच्या वसुलीच्या प्लॅनवर उघडले. त्यानंतर परमबीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते आणि तिथून त्यांच्यावर कारवाई सुरू झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT