महाराष्ट्र सरकार परमबीर सिंगांना 'फरार' घोषित करणार

मे महिन्यापासून परमबीर सिंग हे प्रकृतीच्या कारणास्तव रजेवर गेले आणि तेंव्हापासून ते बेपत्ता आहेत
Maharashtra home department process of declaring fugitive to former Mumbai police commissioner Parambir Singh
Maharashtra home department process of declaring fugitive to former Mumbai police commissioner Parambir Singh Dainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्राच्या (Maharashtra Government) गृह विभागाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांना फरारी घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. गृहविभागाने इंटेलिजन्स ब्युरोला (IB) कळवले आहे की आयपीएस अधिकारी परमबीर सिंग सापडत नाही आणि त्याचा शोध घेण्यासाठी केंद्रीय एजन्सीचीही मदत देखील मागितली आहे.(Maharashtra home department process of declaring fugitive to former Mumbai police commissioner Parambir Singh)

वास्तविक, महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरारी घोषित करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. विभागाने कायदेशीर औपचारिकता पाळून प्रस्ताव निर्दोष बनवण्यासाठी कायदेशीर अभिप्राय मागवला आहे. त्याचवेळी गेल्या वर्षी मे महिन्यापासून बेपत्ता झाल्यानंतर राज्याने या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच ठेवला होता. त्यानंतर गृहविभागाने अँटिलिया स्फोटक प्रकरणी त्यांच्याविरोधात विभागीय चौकशीची कार्यवाही देखील सुरू केली आहे.

परमबीर सिंग यांना फरारी घोषित करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू

याबाबत माहिती देताना गृह विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'आम्ही केंद्रीय एजन्सीला कळवले आहे की मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा शोध घेता येत नाही. या दरम्यान 3 महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी त्यांनी आपल्या कामाची माहितीही दिली नाही. आयबीकडे मदतीची विनंती करताना आम्ही त्यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे त्यांनी सांगितले आहे . यासाठी आम्ही वकिलांचा कायदेशीर सल्लाही घेत आहोत.अशी माहिती देखील या अधिकाऱ्याने दिली असल्याचे समजत आहे.

Maharashtra home department process of declaring fugitive to former Mumbai police commissioner Parambir Singh
केंद्र सरकारकडून बॉलीवूडला टार्गेट केले जातंय; शिवसेनेकडून हल्लाबोल

दरम्यान मे महिन्यापासून परमबीर सिंग हे प्रकृतीच्या कारणास्तव रजेवर गेले आणि तेंव्हापासून ते बेपत्ता आहेत .अशा परिस्थितीत गृहविभागाने सिंह यांना त्यांच्या चंदीगड येथील निवासस्थानी अनेक पत्रे पाठवून त्यांचा ठावठिकाणा विचारला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याच वेळी, गेल्या महिन्यात गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले होते की, आयपीएस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी ते अखिल भारतीय सेवा (आचारण) नियमांच्या तरतुदींचा विचार करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com