Uddhav Thackaray Dainik Gomantak
महाराष्ट्र

ठाकरे सरकारचा 'गट अ' आणि 'गट ब' अधिकाऱ्यांसाठी मोठा निर्णय!

आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकिमध्ये 'गट अ' आणि 'गट ब' मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीत हे अनुकंपाचे धोरण लागू करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यातील प्रशासकिय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackaray) यांनी मोठा दिलासा दिला आहे. सध्या शासकिय सेवेमध्ये असलेल्या 'गट क' आणि 'गट ड' कर्मचाऱ्यांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना अनुकंपा तत्वावर सरकारी नोकरी देण्यात येते. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकिमध्ये 'गट अ' आणि 'गट ब' मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीत हे अनुकंपाचे धोरण लागू करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान कोरोना (Coronavirus) काळात राज्यात बऱ्याच शासकिय अधिकाऱ्यांचे निधन झाले असून अधिकारी संघटनेने राज्यात अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी केली होती. अधिकाऱ्यांच्या मागणीप्रमाणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अनुकंपा धोरणाचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडऴाच्या बैठकित मांडण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर ओढावणाऱ्या आर्थिक परिस्थितीमधून दिलासा दिलासा मिळणार आहे.

तसेच, गट अ किंवा गट ब मधील अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबामधील पात्र सदस्यास अनुकंपा तत्वावर गट क किंवा गट ड मधील नोकरी देण्यात येईल असा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय अनुकंपा नियुक्तीसाठी आदेश एकत्रित करत महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम 2021 तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता अनुकंपा संदर्भातील प्रशासकिय अडचणी दूर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT