Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

ठाकरे सरकारची कोकण वासीयांसाठी मोठी घोषणा!

गणेशत्सव साजरा करण्यासाठी कोकणवासी पुणे, मुंबईतून (Mumbai) खास कोकणामध्ये जातात.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रावर (Maharashtra) कोरोनाचा सावट (Covid 19) असताना दुसरीकडे गणेशत्सव सुरु होण्यासाठी काही दिवसच राहिले आहेत. राज्यात दरवर्षी गणेशत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशत्सव साजरा करण्यासाठी कोकणवासी पुणे, मुंबईतून (Mumbai) खास कोकणामध्ये जातात. यंदा मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात गणेशत्सव साधेपणाने साजरा करण्यात यावा अशा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. याच पाश्वभूमीवर ठाकरे सरकारची (Thackeray Government) महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde) यांनी चाकरमान्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

दरम्यान, गणेशत्सवाला अवघे पाचच दिवस बाकी राहिले आहेत. यंदाही गणेशत्सवसाठी गोवा-मुंबई तसेच पुण्याहून कोकणात जाणाऱ्यांना टोल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. यासंबंधीची घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी यंदाही मुंबई-गोवा, मुंबई-कोल्हापूर मार्गावर टोलमाफी मिळणार आहे. त्याचबरोबर पोलिस, वाहतूक पोलिस, खड्डे दुरुस्ती अशा आणि इतर अनेक उपाययोजना करण्यासाठी आज राज्य सरकारने बैठक घेतली आहे.

शिवाय, कोकण मार्गावरील टोल सवलत, टोल स्टिकर देण्याचा निर्णयही राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. यासाठी नागरिकांना गाडीची माहिती दिल्यानंतर स्टिकरही देण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या अवघ्या दोन दिवसाआगोदर आणि विसर्जनाच्या 2 सेवा कार्यरत असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

...त्यांनी मला रडवलं, ओझं घेऊन भर पावसात 5KM चालले; दक्षिण गोव्यात टॅक्सी माफियांची गुंडागर्दी, गुजराती महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव Video

Akasa Air चा सावळा गोंधळ, पुण्यात सुरक्षा तपासणी विलंबामुळे सहाजण गोव्यातील शूटिंग चॅम्पियनशिपला मुकले

Goa Live Updates: थिवी रेल्वे स्थानकात 3 लाखांचा गांजा जप्त

Goa Tourism: 'गोव्याची बदनामी थांबवूया'! रस्ते, भटकी जनावरे, भिकारी प्रश्नांवर चर्चा; नागवा-हडफडेत पर्यटन हंगामाबाबत बैठक

Codar IIT Project: 'गावात आयआयटी नकोच'! गावडेंचा कोडारवासीयांना पाठिंबा; विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असल्याची दिली माहिती

SCROLL FOR NEXT