सिंधुदुर्ग: महाराष्ट्रात ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी (OBC Reservation) भाजप (BJP) कार्यकर्ते आक्रमक झाले असून राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. सिंधुदुर्गात (Sindhudurg) आज भाजपच्या वतीने ओबीसी राजकिय आरक्षण संदर्भात मुबंई-गोवा (Mumbai Goa) महामार्गावरील कुडाळ येथे निलेश राणे (Nilesh Rane) आणि नीतेश राणे (Nitesh Rane) यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात केले आहे. यावेळी ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषबाजी करण्यात आली. तर आंदोलन स्थळी काही भाजप कार्यकर्त्यांकडून हायवेवर टायर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनां पोलिसांनी ताब्यात घेतले. (Chakkajam led by Nilesh Rane and Nitesh Rane at Kudal on Mumbai Goa Highway)
ठाकरे सरकार झोपेचं सोंग करत आहे तर मंत्री वेगवेगळ्या धूंधीत आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुबंई किंवा पुण्याच्या बाहेर कधी दिसत नाही. मस्ती करण्यासाठी आपआपले जिल्हे वाटून घेतले आहे, त्यामुळे त्याच्याकडून महाराष्ट्राचे विषय सुटतीलच. 15 महिने सरकार झोपलं होत अशी जोरदार टिका राणे यांनी या आंदोलनावेळी केली.
दरम्यान राज्य सरकार (Maharashtra) आपल्या अपयशाचे खापर मोदींवर फोडते आहे. त्याचबरोबर राज्याच्या मंत्रिमंडळात ओबीसी नेत्यांचे महत्त्व ताटातल्या चटणीएवढं आहे. घरी बायकोने मारले तरी ते त्यासाठी मोदींनाच (Narendra Modi) जबाबदार धरणार असा टोला त्यांनी मंत्रींडळातील नेत्यांवर लगावला. नागपुरमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आंदोलन सुरु झाले आहे. यावेळी फडणविस यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
त्याचबरोबर बीड, औरंगाबाद, नवी मुंबई आणि इतर ठिकाणी आंदोलनातील BJP कार्यकर्त्यांना पालिसांनी ताब्यात घेण्यास सुरवात केली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी पुण्यात भाजप आक्रमक झाले असून ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक होऊ देणार नाही, असा घणाघात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर केला आहे. आणि आता त्यांना ही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आणि मुंबईत पोलिसांकडूनही आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.