Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

डिझेल टँकर अन् ट्रकचा भीषण अपघात! 9 जणांचा जागीच मृत्यू

महाराष्ट्रातील चंद्रपुर जिल्ह्यात आज मोठा भीषण अपघात झाला.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील चंद्रपुर जिल्ह्यात आज मोठा भीषण अपघात झाला. चंद्रपुरच्या (Chandrapur) मुळ मार्गावरील अजयपूर येथील रिव्हरव्ह्यूजवळ लाकडांनी भरलेला ट्रक व डिझेल टँकर यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात भीषण 9 लोकांचा जागीच मृत्यू झाला. (Chandrapur Accident)

(Fierce fire) लागून दोन्ही वाहनांतील चालकांसह 9 मजुरांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. हा अपघात गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मूळमार्गावरील अजयपूर गावाजवळ घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्रीच्या सुमारास लाकूड भरलेला ट्रक चंद्रपूरच्या दिशेने जात होता. तर, डिझेल भरलेला एक टँकर चंद्रपूरच्या दिशेना येत होता. दरम्यान, अजयपूरजवळ या दोन्ही वाहनांची धडक होऊन गाड्यांना आग लागली. यावेळी एका वाहनात लाकूड व दुसऱ्या वाहनात डिझेल असल्याने जागीच जोरदार भडका उडाला. यावेळी लाकडू असलेल्या वाहनातील चालकासह 6 मजूर, डिझेल असलेल्या वाहनातील तिघेजण अशा एकूण 9 जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे.

चालक अक्षय सुधाकर डोंगरे (30) बीटीएस प्लॉट बल्लारशा, मजूर प्रशांत मनोहर नगराळे (28), कालू प्रल्हाद टिपले (35), मैपाल आनंदराव मडचापे (24),बाळकृष्ण तुकाराम तेलंग (40),साईनाथ बापूजी कोडापे (35), संदीप रवींद्र आत्राम (22) सर्व राहणार दहेली व टँकरचालक हाफिज खान (38) अमरावती, मजूर संजय पाटील (35) वर्धा अशी मृतांची नावे आहेत.

या अपघातामुळे संपूर्ण रस्ताभर आग पसरल्याने मूल व चंद्रपूर मार्गावरील वाहतूक खंडित झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा देखील लागल्या होत्या. माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळ गाठले. आणि चंद्रपूर, बल्लारशा, सीटीपीएस चंद्रपूर, पोंभूर्णा, मुल येथून अग्निशमन वाहन बोलाविण्यात आले आहे. आग आटोक्यात आली असली तरी आज सकाळी 9 वाजेपर्यंत टँकर जागीच जळत होता. सकाळी अग्निशमन गाडीने पुन्हा आग विझवण्यात आली. तपास अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून सर्व जळालेले मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT