Education Minister Varsha Gaikwad dainik gomantak
महाराष्ट्र

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य सरकार उचलणार मोठी पावलं

शिक्षकांसाठी बातमी : राज्यातील शिक्षकांना मिळणार परदेशात ट्रेनिंग

दैनिक गोमन्तक

मुंबई : गेल्या वर्षात कोरोनाने अनेकांचे हाल केले. अनेकांचा रोजगार बुडाला. तर अनेक उद्योगधंद्याना त्याचा फटका बसला. असचा फटका राज्यातील शिक्षणाला बसला असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे नभरता येणारे नुकसान झाले. पण विद्यार्थ्यांचे भविष्य हे अंधार जाऊ नये म्हणून राज्यशासनाने पावले उचलत ऑनलाईन शिक्षण सुरू केले. पण यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा संपर्क कमी झाला होता. ज्यामुळे शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारायला हवा अशी मागणी होत आहे. तर शालेय शिक्षण विभागाची अशीच मागणी ही आहे. त्यानुसार शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक शिक्षकांसाठी असून शिक्षकांना परदेशात मिळणार प्रशिक्षण आहे. (Teachers in the state will get training abroad)

शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी शालेय शिक्षकांना फिनलँड (Finland) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) या देशांमध्ये ट्रेनिंग देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (School education Minister Varsha Gaikwad)यांनी यावेळी दिली आहे.

राज्य सरकार फक्त मुलांच्या भौतिक सुविधांवरच लक्ष देतेय असं नाही तर बोर्डानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर काम सुरु असल्याचेही गायकवाड यांनी सांगितलं. तर निजामकालीन शाळांसाठी 160 कोटी रुपये निधी प्रस्तावित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तर आदर्श शाळांसाठी या वर्षी 54 कोटी प्रस्तावित करण्यात आले असून पुढल्या वर्षीसाठी 300 कोटी ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच प्रत्येक जिल्ह्यात e-लायब्ररी (e-library) आणि अभ्यासिका तयार करण्यात येणार आहेत अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे. तर विद्यार्थ्यांसाठी कॉम्पुटर (Computer) आणि लँग्वेज लॅबची (Language Lab) सोय करण्यात येणार आहे असेही माहिती त्यांनी दिली. त्याबरोबर विद्यार्थ्यांना good touch आणि bad touch याचं शिक्षण दिले जाईल असही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT