Paragliding  File Photo
महाराष्ट्र

Kullu-Manali: पॅराग्लायडिंग करताना 800 फुटावरून खाली पडला, कुलू-मनालीत साताऱ्यातील युवकाचा मृत्यू

Pramod Yadav

कुलू-मनाली, हिमाचल प्रदेशात येथे पॅराग्लायडिंग करताना साताऱ्यातील युवकाचा मृत्यू झाला आहे. पॅराशूटचा बेल्ट निसटून युवक खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. सूरज शहा (रा. शिरवळ, सातारा) असे या अपघातात मृत्यू झालेला युवकाचे नाव आहे. तो 30 वर्षांचा होता. या घटनेमुळे शिरवळ शहरावर शोककळा पसरली आहे. याशिवाय दुसऱ्या घटनेत दक्षिण कोरियातील व्यक्तीचा देखील मृत्यू झाला आहे.

(Suraj Shah From Shirwal Satara dies while Paragliding in Kullu-Manali)

मिळालेल्या माहितीनुसार, सुरज मित्रांसोबत तो ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी कुलू-मनालीला गेला होता. सुरज सुमारे 800 फुटावरून खाली पडला असल्याचे सांगण्यात येते. डोभी येथून पॅराग्लायडिंगसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळेतच सूरजचा सेफ्टी बेल्ट खुला झाला. त्यानंतर तो खाली कोसळला. उपचारासाठी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पॅराशुट पायलटवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

सूरजला सेफ्टी बेल्टची माहिती देण्यात आली होती, असे पॅराशुट पायलटने सांगितले. सूरजा हात वारंवार सेफ्टी बेल्टवर जात होता. त्यामुळे सेफ्टी बेल्ट उघडला. हाताच्या साहाय्याने सूरजला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे वजन अधिक असल्याने त्याला वाचवता आले नाही. पॅराशुट पायलटवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT