Parambir Singh Dainik Gomantak
महाराष्ट्र

'कोई दूध का धुला नहीं', परमबीर सिंगांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) विरुद्ध महाराष्ट्र सरकार यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना मोठा दिलासा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग विरुद्ध महाराष्ट्र सरकार यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग (Parambir Singh) यांना मोठा दिलासा दिला आहे. सिंग यांच्यावरील सर्व कारवाईला न्यायालयाने 9 मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे. परमबीर सिंग यांच्यावरील संपूर्ण एफआयआर केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) हस्तांतरित करायचा की नाही याचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) घेणार आहे. (Supreme Court Grants Relief To Parambir Singh)

दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी 9 मार्च रोजी होणार आहे. तोपर्यंत महाराष्ट्र सरकार सर्व प्रकरणांची चौकशी करेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान महाराष्ट्र सरकार आणि परमबीर सिंग या दोघांनाही फटकारले आहे.

तसेच, सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एस.के. कौल म्हणाले, "आम्हाला पुन्हा सांगायचे आहे की ही गोंधळाची परिस्थिती आहे. यात कोणीही निर्दोष नाही. अशा परिस्थीतीमुळे लोकांचा राज्य प्रशासन आणि पोलिस यंत्रणेवरील विश्वास उडवण्याची शक्यता अधिक बळावेल आहे. आणि ही सर्वात वाईट बाब असेल."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT