Sharad Pawar Sambhaji Raje Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज्यसभेसाठी पाठींबा द्या; मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी घेतली शरद पवारांची भेट

संभाजीराजे छत्रपती उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; खलबतांना वेग

दैनिक गोमन्तक

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सक्रियपणे राज्यातील नेत्यांच्या भेटीगाटी घेत आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न ही सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आपली भुमिका स्पष्ट केली आहे. मात्र आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला, महाविकास आघाडी नव्हे तर शिवसेनेच्या उमेदवाराला आपला पाठिंबा असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं तसेच संभाजीराजेंनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार व्हावं अशी इच्छाही बोलावून दाखवली आहे. ( Support for Rajya Sabha; Maratha Kranti Morcha coordinators met Sharad Pawar )

मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी शरद पवारांची आज पुण्यामध्ये भेट राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंना पाठिंबा द्यावा या मागणीसाठी केली. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, संभाजीराजे यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार व्हावं अशी इच्छा आहे. शिवसेना पुरस्कृत किंवा शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारालाच राष्ट्रवादी पाठींबा देणार. संभाजीराजे यांना राष्ट्रवादीचा पाठींबा असं आपण कधी बोललो नाही, माझ्या नांदेडमधील वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला.

संभाजीराजे छत्रपती शिवसेनेच्या वाटेवर ?

मिळालेल्या माहितीनुसार संभाजीराजे छत्रपती उद्या दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जाणार असल्याचे वृत्त आहे. त्यामूळे संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे .उद्या दुपारी 12 वाजता संभाजीराजे छत्रपती यांनी अधिकृत पक्षप्रवेश करावं, त्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात येईल असा निरोप शिवसेनेच्या वतीनं संभाजीराजेंना देण्यात आल्याचं सांगितलं जातय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'त्या' रशियन पर्यटकाने केले 15 खून? सीरियल किलरने उडविली गोवा पोलिसांची झोप; संशयिताला 14 दिवसांची पोलिस कोठडी

Weekly Horoscope: धन, यश आणि मान-सन्मान देणारा आठवडा! 'या' राशींवर लक्ष्मीची विशेष कृपा; वाचा संपूर्ण माहिती

Hadkolan Goa: रेड्यांच्या जत्रेसाठी सुप्रसिद्ध असलेले, निसर्ग सौंदर्याने सजलेलले गाव 'अडकोळण'

Iran America Tension: "ट्रम्प इराणचे गुन्हेगार...!", खामेनेई यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षावर ठेवला विध्वंसाचा ठपका; जागतिक राजकारणात पुन्हा खळबळ

Goa Crime: आधी प्रेम, मग अनन्वित अत्याचार अन् शेवटी गळा चिरला, रशियन सिरीयल किलरच्या क्रूरतेनं हादरला गोवा; लवकरच उलघडणार 10 तरुणींच्या मृत्यूचं गूढ?

SCROLL FOR NEXT