IIT Bombay  Dainik Gomantak
महाराष्ट्र

IIT Bombay मधील 18 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, पोलिस तपास सुरु

रिपोर्ट्सनुसार, हा विद्यार्थी गुजरातमधील अहमदाबादचा असून तो आयआयटीमध्ये केमिकल इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत होता.

Manish Jadhav

IIT Bombay: पवई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT Bombay) मुंबईतील एका 18 वर्षीय विद्यार्थ्याचा संस्थेच्या वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे.

रिपोर्ट्सनुसार, हा विद्यार्थी गुजरातमधील अहमदाबादचा असून तो आयआयटीमध्ये केमिकल इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11.30 वाजता विद्यार्थी (Student) सातव्या मजल्यावरुन पडला होता. पोलिसांना घटनास्थळावरुन कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही.

त्याचबरोबर कॅम्पसमध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याशी भेदभाव केला जात असल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. यामुळेच त्याने आत्महत्या केली. सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

पोलिसांनी (Police) सांगितले की, दर्शन सोलंकी हा बीटेकचा विद्यार्थी असून तो अहमदाबादचा रहिवासी होता. तीन महिन्यांपूर्वी त्याने या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. शनिवारी त्याच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा संपल्या.

अभ्यासाच्या तणावाखाली त्याने हे टोकाचे पाऊल उचलले का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पवई पोलीस करत आहेत.

दुसरीकडे, APPSC (आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल) आयआयटी बॉम्बेने ट्विट केले की, "आम्ही दर्शन सोलंकी या 18 वर्षीय दलित विद्यार्थ्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. तो 3 महिन्यांपूर्वी आयआयटी बॉम्बेमध्ये दाखल झाला होता. आपण हे समजून घेतले पाहिजे की, ही वैयक्तिक किंवा खाजगी समस्या नसून संस्थात्मक हत्या आहे."

एसएसपी बुधन सावंत म्हणाले की, 'प्राथमिक माहितीच्या आधारे आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाची पाहणी सुरु आहे.' ते पुढे म्हणाले की, 'प्रथम दर्शनी असे दिसते की, दर्शन डिप्रेशनमध्ये होता. या प्रकरणाची प्रत्येक बाजूने चौकशी केली जात आहे.

परीक्षेमुळे त्याने आत्महत्या केली का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. मात्र, कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. त्यामुळेच मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घरात भांडण करुन पळाले, कच्छच्या जंगलात गाववाल्यांनी पकडले, अल्पवयीन पाकिस्तानी जोडप्याने प्रेमासाठी पार केली देशाची सीमा

Fishing Boat Accident: काणकोणातील राजबाग किनाऱ्यावर पुन्हा बोट उलटली, स्थानिक मदतीसाठी धावले!

Viral Video: बिहारमधून दिसू लागला हिमालय आणि माऊंट एव्हरेस्ट; मनमोहक व्हिडिओ आला समोर Watch

Goa Politics: आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत याची गॅरंटी द्या! ‘आप’चा काँग्रेससोबत युतीस स्पष्ट नकार

Shubhman Gill: "त्यांनी भारताला स्वबळावर अनेक सामने जिंकून दिले, आम्हाला त्यांची गरज..." नवा कर्णधार शुभमन गिलचे रोहित-विराटबाबत मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT