Student Attacks Teacher with Knife At Mira Road. Dainik Gomantak
महाराष्ट्र

Crime News: शिक्षकाच्या अंगलट आभ्यासाचा सल्ला; अल्पवयीन विद्यार्थ्याचा गुरुवरच चाकू हल्ला

Crime News: ही घटना मीरा रोड येथील पेणकरपाडा भागातील एका जनरल स्टोअरबाहेर दुपारी दीडच्या सुमारास घडली. या गुन्ह्याचा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Ashutosh Masgaunde

Student Attacks Teacher with Knife at Mira Road:

काशिमिरा येथे गुरुवारी दुपारी एका 17 वर्षीय मुलाने कोचिंग क्लासच्या शिक्षकावर चाकूने वार केले. त्यानंतर स्व:ता पोलिसांसमोर हजर झाला. या गुन्ह्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाला आहे.

शिक्षकाने मुलाला अभ्यासावर लक्ष देण्यास सांगितले होते. त्या रागातून मुलाने शिक्षकावर हल्ला केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मीरा रोडच्या (Mira Road) पेणकरपाडा भागातील एका जनरल स्टोअरच्या बाहेर रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.

राजू उमाशंकर ठाकूर (२६) असे पीडित शिक्षकाचे नाव असून तो जवळच्या सुप्रभात चाळीमध्ये कोचिंग क्लास चालवतात.

ठाकूर हे काही स्थानिकांसोबत बोलत होते, त्यावेळी आरोपीने चाकू घेऊन त्याच्या पोटात वार केले. त्यानंतर त्याने काशिमीरा पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.

ठाकूर यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

"हल्‍ल्‍यामागील नेमका हेतू अद्याप कळू शकला नसला तरी, प्रथमदर्शनी तपासात असे दिसून आले आहे की हल्लेखोर आणि पीडित यांच्यामध्ये काही जुने वाद होते आणि त्यामधूनच हा प्रकार घडला असल्याचे," असे तपास अधिकारी म्हणाले.

कोचिंग क्लास चालवणाऱ्या ठाकूरने विद्यार्थ्याला वर्गात मारले होते का? याचाही तपास पोलीस करत आहेत. दोघांमध्ये वाद झाला कारण ठाकूरने मुलाला "त्याच्या अभ्यासावर लक्ष देत नसल्याबद्द आणि सारखे विद्यार्थिनींशी जवळीक करतो म्हणून रागावले होते.

शिक्षक ठाकूर यांनी एका विद्यार्थ्याला आरोपी मुलाशी संपर्क टळायला आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते, ज्यामुळे अल्पवयीन हल्लेखोर चिडला.

पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध आरोप निश्चित केलेले नाहीत आणि हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT